Home / News / iPhone 17 Rush: Publicity Stunt? आयफोन १७ खरेदीसाठी झुंबड की अ‍ॅपलचा पब्लिसिटी स्टंट ?

iPhone 17 Rush: Publicity Stunt? आयफोन १७ खरेदीसाठी झुंबड की अ‍ॅपलचा पब्लिसिटी स्टंट ?

Huge Rush to Buy iPhone 17 — Apple’s Publicity Stunt? iPhone 17 Rush: Publicity Stunt? – नुकताच लाँच झालेला आयफोन...

By: Team Navakal
iPhone 17 Rush: Publicity Stunt?

Huge Rush to Buy iPhone 17 — Apple’s Publicity Stunt?

iPhone 17 Rush: Publicity Stunt? – नुकताच लाँच झालेला आयफोन १७(iPhone 17) हा अ‍ॅपलचा (Apple) नवा मोबाईल फोन (new mobile series) घेण्यासाठी आज मुंबई, (mumbai)दिल्ली, (delhi)बंगळूरु, (banglore)पुणे (pune)आणि हैदराबाद येथील अ‍ॅपल स्टोअरबाहेर मोठी गर्दी उसळली. मुंबईतील वांद्रे आणि बीकेसी जिओ सेंटरसमोर पहाटेपासून रांग लागली होती. यावेळी काही ग्राहकांमध्ये बाचाबाची आणि मारामारी झाली.(Huge Rush) सुरक्षा कर्मचाऱ्यांन हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

विशेष म्हणजे, अनेक यूट्यूबर व टेक इन्फ्लुएन्सरनी आयफोन १६ प्रो मॅक्सच्या तुलनेत फारसे नवे फिचर्स नसल्याने आयफोन १७ ची खरेदी टाळा असा सल्ला दिला होता. त्यामुळे काही दिवसापूर्वी अ‍ॅपलच्या शेअरमध्ये घसरण झाली होती. तरीही हा फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली. त्यामुळे अॅपलचा हा पब्लिसिटी स्टंट होता की काय, अशीही चर्चा होत होती. दरम्यान, आयफोन १७ लाँच झाल्यानंतर शेअरमध्ये तब्बल ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

अॅपलने आयफोन १७द्वारे कॉस्मिक ऑरेंज (भगवा) हा रंग आयफोन सीरिजमध्ये पहिल्यांदाच आणला आहे. त्याचा आकर्षक प्रीमियम मॅट फिनिश ग्राहकांना आवडत आहे. आयफोन १७ च्या लाँचनंतर अॅपलने आयफोन १६ सीरिजची किंमत कमी करण्यात आली आहे. दरवर्षी अ‍ॅपल नवा आयफोन बाजारात आणते आणि लाखो ग्राहक त्यासाठी रांग लावतात. यावरून समाजमाध्यमांवरही मजेशीर मीम्स व्हायरल झाले असून, मी तरुणपणी सिलेंडरच्या लाईनमध्ये उभा राहायचो, आता पिढी आयफोनच्या रांगेत लागते, असा फोटो एका मिममध्ये पाहायला मिळत आहे.


हे देखील वाचा – 

 मनमोहन सिंगांनी माझे आभार मानले! यासिन मलिकचा दावा

माझ्या रेस्टॉरंटने फक्त 50 रुपयांची कमाई केली’; पूरग्रस्तांसमोर कंगना रनौतने मांडले स्वतःचेच गाऱ्हाणे

iPhone 17 खरेदी करायचा आहे? पहिल्याच सेलमध्ये मिळवा मोठी सूट, जाणून घ्या सर्व ऑफर्स

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या