IRCTC Website Crashes Again – रेल्वेची तिकिटे ऑनलाईन बुकिंगची सुविधा देणाऱ्या आयआरसीटीसीची वेबसाईट आज पुन्हा एकदा ठप्प झाली.महत्वाचे म्हणजे तिकीट बुकिंगसाठीच्या रेल्वेच्या मोबाईल अॅपमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.
त्यामुळे तत्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
आयआरसीटीसीची वेबसाईट ठप्प होण्याची ही पहिली वेळ नाही.यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये तीन वेळा वेबासाईट तांत्रिक कारणांनी ठप्प झाली होती.
यावेळी धन त्रयोदशीच्या आदल्या दिवशी तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या वेळेस वेबसाईट ठप्प झाली.
रेल्वेची तिकिटे ऑनलाईन बुक करण्यासाठी आयआरसीटीसीची एकमेव वेबसाईट आहे.
या वेबसाईटवर दररोज सुमारे साडेबारा लाख तिकिटांचे बुकिंग होते.रेल्वेच्या एकूण तिकिट विक्रीपैकी सुमारे ८४ टक्के तिकिटे आयआरसीटीसीची वेबसाईट आणि अॅपद्वारे बुकिंग केली जातात.
हे देखील वाचा –
हरिओमच्या कुटुंबियांची राहुल गांधींनी भेट घेतली
यंदा शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी साजरी करणार ! शरद पवारांची माहिती