ISRO’s First Air-Drop Test for Gaganyaan Successful
नवी दिल्ली – भारताच्या गगनयान मानव अंतराळ (ISRO Gaganyaan air-drop test)मोहिमेच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा गाठून इस्रोने आज पहिली एकत्रित एअर ड्रॉप चाचणी (आयएडीटी – ०१) यशस्वीपणे पूर्ण केली आहे.(Gaganyaan parachute test) ही चाचणी इस्रो, भारतीय हवाई दल, संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ), भारतीय नौदल आणि तटरक्षक दल यांच्या संयुक्त सहकार्याने पार पडली.
याबाबत इस्रोने एक्स पोस्ट केली की,गगनयान मोहिमेसाठी पॅराशूट आधारित वेग-निर्मूलन प्रणालीच्या अखंड कार्यक्षमतेसाठी आयएडीटी – ०१ चाचणी यशस्वी झाली आहे.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी सांगितले की, ह्युमन रेटेड लॉन्च व्हेईकलचा विकास व जमिनीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ऑर्बिटल मॉड्यूलसाठी आवश्यक प्रणोदन प्रणाली, ईसीएलएसएस,(ECLSS) क्रू एस्केप सिस्टीमसाठी पाच मोटर, नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र यांची उभारणी झाली आहे.
मानवरहित चाचणी उड्डाण (जी १ ) अंतिम टप्प्यात आहे, टीव्ही – डी१ यानाद्वारे सीईएस यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. भारताच्या दीर्घकालीन अंतराळ योजनांनुसार, २०३५ पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर पाठवण्याचे उद्दिष्ट आहे.