Home / News / Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी होईल उपयोग, किंमत फक्त…

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी होईल उपयोग, किंमत फक्त…

Jio Recharge Plan : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे एकापेक्षा एक अनेक स्वस्त रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आता कंपनीने ट्रायच्या नवीन नियमांतर्गत केवळ...

By: Team Navakal

Jio Recharge Plan : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे एकापेक्षा एक अनेक स्वस्त रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत. आता कंपनीने ट्रायच्या नवीन नियमांतर्गत केवळ कॉलिंग आणि एसएमएस सुविधेसह येणारे प्लान्स लाँच केले आहेत. कंपनीने 189 रुपयांचा प्लान पुन्हा सादर केला आहे. काही दिवसांपूर्वी हा प्लान जिओ अ‍ॅपवरून हटवण्यात आला होता, मात्र आता पुन्हा ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे.

जिओचा 189 रुपयांचा प्लान

जिओच्या 189 रुपयांच्या प्लानची वैधता 28 दिवस आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, एकूण 300 एसएमएस आणि 2 जीबी डेटाचा फायदा मिळतो. जे ग्राहक केवळ सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी रिचार्ज प्लान शोधत आहेत, त्यांच्यासाठी 189 रुपयांचा प्लान सर्वोत्तम आहे.

जिओचा 448 रुपयांचा प्लान

जिओकडे केवळ कॉलिंग आणि एसएमएससह येणारा 84 दिवसांचा प्लान देखील आहे. या प्लानची किंमत 448 रुपये असून, यात 1000 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगसह जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शन मिळते.

जिओचा 1748 रुपयांचा प्लान

जिओच्या 1748 रुपयांच्या प्लानची वैधता 336 दिवस आहे. यामध्ये तुम्हाला एकूण 3600 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंगसह जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या

Share:

More Posts