Home / News / korean lover game : कोरियन लव्हरगेमच्या टास्कसाठी ३ बहिणींची नवव्या मजल्यावरून उडी ; किशोरवयीनांवर ऑनलाइन गेम्सचा प्रभाव ?

korean lover game : कोरियन लव्हरगेमच्या टास्कसाठी ३ बहिणींची नवव्या मजल्यावरून उडी ; किशोरवयीनांवर ऑनलाइन गेम्सचा प्रभाव ?

korean lover game : ब्लू व्हेल चॅलेंजनंतर (Blue Whale Challenge)आता कोरियन लव्हरया ऑनलाइन गेमच्या (Korean Lover online game)टास्कसाठी गाजियाबादमध्ये तीन...

By: Team Navakal
korean lover game
Social + WhatsApp CTA

korean lover game : ब्लू व्हेल चॅलेंजनंतर (Blue Whale Challenge)आता कोरियन लव्हरया ऑनलाइन गेमच्या (Korean Lover online game)टास्कसाठी गाजियाबादमध्ये तीन सख्या अल्पवयीन बहिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझियाबादमधील (Ghaziabad)भारत सिटीमध्ये कोरियन लवर गेमचा शेवटचा टास्क पूर्ण करण्यासाठी रात्री उशिरा २ वाजून ३० मिनिटांनी निशिका (१६), प्राची (१४), पाखी (१२) या तीन सख्ख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवने.

मुलींचे वडील चेतन कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुली काही दिवसांपासून कोरियन लव्हरप्रकारातील ऑनलाइन गेम/अॅप्समध्ये गुंतल्या होत्या. पोलिसांनी तपासासाठी त्यांचा फोन आपल्यासोबत नेला आहे. गेममध्ये एकूण ५० टास्क होते. घटनेच्या दिवशी शेवटचा टास्क असल्याचे त्या बोलत होत्या.

याबाबत पोलीस आयुक्त अतुल कुमार (Police Commissioner Atul Kumar)यांनी सांगितले की, रात्री २.१५ वाजता माहिती मिळताच पोलिस पथक त्वरित टॉवर बी-१, फ्लॅट क्रमांक ९०७ येथे पोहोचले.घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मोबाईल फोन व डिजिटल पुरावे (digital evidence)जप्त करण्यात आले आहेत.

या मुली खेळात असलेला गेममध्ये त्या स्वतःला कोरियन राजकन्या (Korean princesses) समजू लागल्या होत्या. या तिघींनी हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या पालकांसाठी एक चिट्ठी देखील लिहून ठेवली होती. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्येही आपण भारतीय नसून कोरियन असल्याचा उल्लेख केला होता. तसेच आई -पाप माफ करा असे ही लिहिले होते. १४ वर्षांची प्राची या गेमची लीडर होती. तिच सर्वांना आदेश द्यायची आणि तिघीही प्रत्येक काम एकत्र करायच्या. ज्यामुळे तिघींची ही कृतीसुद्धा गेमच्या टास्कनुसारच करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुलींच्या वडिलांनी दोन विवाह केले होते. त्यांनी ज्या दोन महिलांशी विवाह केला, त्या सख्ख्या बहिणी आहेत. पहिल्या पत्नीकडून सुरुवातीला अपत्यप्राप्ती न झाल्याने त्यांनी दुसऱ्या पत्नीसोबत विवाह केला. या दुसऱ्या पत्नीपासून त्यांना तीन मुली झाल्या. दरम्यान, पुढील काळात पहिल्या पत्नीलाही दोन अपत्ये झाली. मृत मुलींमध्ये दोन मुली दुसऱ्या पत्नीच्या, तर एक मुलगी पहिल्या पत्नीची होती.

कोरियन लव्हर गेम आहे तरी काय ?

PUBG किंवा Minecraft सारख्या ऑनलाईन खेळांइतका हा प्रकार प्रसिद्ध नसला, तरी ‘कोरियन लव्हर ’ या नावाखाली प्ले स्टोअरवर अनेक स्टोरी-आधारित, रोमँटिक सिम्युलेशन अॅप्स उपलब्ध आहेत. कोरियन लव्हर गेम मनोरंजनासाठी खेळला जाणारा गेम नाही. हा एक ऑनलाईन टास्क बेस्ड इंटरऍक्टिव्ह गेम आहे. या अॅप्समध्ये वापरकर्त्यांना संवाद, पर्याय आणि कथानकावर आधारित अनुभव दिला जातो. खेळाडू आपल्या निवडींनुसार कथा पुढे नेतात आणि त्यानुसार शेवट बदलू शकतो. हे अॅप्स प्रामुख्याने मोबाईलवर खेळले जातात आणि के-ड्रामा, के-पॉप किंवा कोरियन संस्कृती आवडणाऱ्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. साधारणपणे त्यातील मजकूर हलकाफुलका, संवादप्रधान आणि रोमँटिक स्वरूपाचा असतो.

प्ले स्टोअरवर ‘Korean Lover Game’ असा शोध घेतल्यास विविध अॅप्स दिसतात. उदाहरणार्थ, Mystic Messenger, Love Alarm: Your Choice, K-Pop Dating Game यांसारखी स्टोरी-आधारित अॅप्स मोठ्या प्रमाणावर डाउनलोड झालेली आहेत. मात्र, गाजियाबादमधील घटनेचा संबंध नेमक्या कोणत्या अॅपशी आहे, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

ब्लू व्हेल ते कोरियन लवर -चॅलेंज की जीवाशी खेळ ?

ब्लू व्हेल हा ऑनलाइन खेळ रशियात तयार करण्यात आला आहे. या खेळात एकूण ५० टप्पे होते . एक आव्हान पूर्ण केलं की पुढल्या टप्प्याचा खेळ सुरू होतो. अखेरचं लक्ष्य आत्महत्येचे होते. जगभरात अनेकांनी या खेळात जीव गमावला . २०१७ मध्ये भारतात अशा स्वरूपाची अनेक प्रकरणे समोर आली होती, ज्यामध्ये ‘ब्लू व्हेल’ला मृत्यूंशी जोडले गेले. ऑगस्ट २०१७ मध्ये एका विद्यार्थ्याने शाळेच्या डायरीत या आव्हानातील ५० टास्क पूर्ण केल्याची नोंद केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले होते. सप्टेंबर २०१७ मध्ये मध्य प्रदेशातूनही घटना नोंदवली गेली.

‘ब्लू व्हेल’ हा पारंपरिक अर्थाने गेम नव्हता, तर ऑनलाइन पसरलेला एक चॅलेंज ट्रेंड मानला जात होता. यात सहभागी व्यक्तींना ठरावीक कालावधीत विविध टास्क पूर्ण करायला सांगितले जात असल्याच्या चर्चा होत्या. काही टास्क धोकादायक स्वरूपाचे असल्याचेही सांगितले गेले. भारतासह रशिया, युरोप आणि दक्षिण आशियातील काही देशांत या संदर्भातील प्रकरणांची नोंद झाली होती.

किकी चॅलेंज

२०१८ मध्ये Kiki Challenge हा ट्रेंड व्हायरल झाला होता. या टास्कमध्ये लोक हळू गाडी चालवत होते, त्यांच्या कारमधून बाहेर पडत होते आणि नाचत होते. या टास्कचा प्रयत्न करताना किंवा सोशल मीडिया ट्रेंडचा उदय कॉमेडियन शिगीने पोस्ट केलेल्या व्हिडिओनंतर झाला होता, अनेक लोक जखमी झाले होते.

मोमो चॅलेंज

२०१८ मध्येही मोमो चॅलेंज व्हायरल झाले होते. मोमो गेम हा ब्लूव्हेलची सुधारित आवृत्ती आहे. गेल्या वर्षी ब्लूव्हेल या गेमनेही धुमाकूळ घातला होता. मोमो हा मुलांना वेगवेगळ्या स्वरुपात टास्क पाठवत असतो. हे टास्क पाठविणारा ओळखीचाही नसतो. यामधील सर्व चॅलेंज पूर्ण केल्यावर जीव देण्याचे चॅलेंजही दिले जाते. यानंतर हा गेम संपतो. या चॅलेंजमध्ये लोकांना स्वतःला हानी पोहोचवणारी कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. कोणत्याही हानीची पुष्टी झाली नसली तरी, त्यावेळी सोशल मीडियावर पोलिसांनी लोकांना अशा आव्हानांमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन केले होते.

कायली लिप चॅलेंज

यात ग्लासमध्ये तोंड टाकून ओठांमार्फत जास्तीत जास्त हवा आत घेण्यात येते. अशानं ओठांना सूज येते. योग्य वेळी लक्ष न दिल्यास नसा फाटून टाके घालण्यापर्यंत वेळ येऊ शकते.

सिनेमन चॅलेंज

पाणी न पिता सिनेमन म्हणजेच दालचिनीची पूड खाण्याचं आव्हान यात देण्यात येतं. यामुळे रॅश, उलटी, जुलाब असे अनेक रोग होऊ शकतात.


हे देखील वाचा –

व्यापार करारावरून संसदेत वादळ; ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप..

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; उड्डाणाआधीच धोका टळला

अजित पवारांचे पुढचे कोणतेही विधी होणार नाहीत, पवार कुटुंबीयांनी अवघ्या ३नच दिवसांत उरकले दशक्रिया विधी

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या