Home / News / न्यायमूर्ती आराध्ये व पांचोलींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती

न्यायमूर्ती आराध्ये व पांचोलींची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती

Supreme Court new Appointed

Supreme Court – सरन्यायाधीश भूषण गवई (Chief Justice Bhushan Gavai ) यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमने शिफारस केलेले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक आराध्ये (Alok Aradhe)आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. विपुल पांचोली (Vipul Pancholi) यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कायदा मंत्रालयाने त्यांची नियुक्ती जाहीर केली.

न्या. आराध्ये आणि न्या. पांचोली यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश यांच्यासह न्यायमूर्तीची संख्या ३४ होणार आहे.न्यायमूर्ती पांचोली हे ३ ऑक्टोबर २०३१ रोजी सेवा ज्येष्ठतेनुसार सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्विकारतील आणि २७ मे २०३३ रोजी निवृत्त होतील.

न्यायमूर्ती आराधे यांना २००९ मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. २०११ मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. पाच वर्षांनंतर, २०१६ मध्ये, त्यांची जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात बदली झाली. २०१८ मध्ये न्या. आराधे यांची कर्नाटक उच्च न्यायालयात बदली झाली.

२०२२ मध्ये त्यांनी काही काळ कर्नाटक उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले. जुलै २०२३ मध्ये त्यांची तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांची मुंबई उच्च न्यायालयत जानेवारी २०२५ मध्ये मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाली.धारावी पुनर्विकास, मोतीलाल नगर पुनर्वसन, पीओपी गणेशमूर्ती (POP Ganesh idols), ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पासह सार्वजनिक प्रकल्प मार्गी लावण्याचे निर्णय मुख्य न्या. आलोक आराधे यांनीच घेतले आहेत.


ज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबई पोलिसांना दिले 20 आश्वासनांचे हमीपत्र, जाणून घ्या काय आहेत अटी-शर्ती

15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे बेस्ट लॅपटॉप ; वाचा फीचर्स आणि किंमत

Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा