Kapil Dev Match-Fixing File Closed? Yuvraj Singh’s Father Questions
Kapil Dev Match-Fixing File Closed – भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) यांचे वडील योगराज सिंग (Yograj Singh)यांनी माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्यावर मॅच फिक्सिंग प्रकरणात गंभीर आरोप केला आहे. कपिल देव यांच्याविरोधातील मॅच फिक्सिंगची (match-fixing case) फाइल का बंद करण्यात आली आणि ती पुन्हा का उघडली जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
योगराज म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात बंद करण्यात आलेल्या मॅच फिक्सिंगची फाईल कुठे आहे? मॅच फिक्सिंगमध्ये कोण कोण सामील होते? प्रथम कपिल देव यांचे नाव आले, मग आझहरुद्दीनचे आणि इतर अनेक खेळाडूंचेही नाव होते. पण फाइल का बंद झाली? कारण अनेक दिग्गजांची नावे उघड झाली असती.
याआधीही योगराज यांनी कपिल देव, एम. एस. धोनी (M.S. Dhoni) आणि बिशन सिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांच्यावर खेळाडूंशी चांगले वर्तन न केल्याचा आरोप केला होता.
१९८३ च्या विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देणारे कर्णधार कपिल देव यांना मनोज प्रभाकर यांच्यासह मॅच फिक्सिंगच्या आरोपांबाबत सीबीआयने चौकशी केली होती. मात्र, त्यांना सर्व आरोपांतून निर्दोष घोषित करण्यात आले. प्रभाकर यांनी १९९७ मध्ये दावा केला होता की, कपिल देव यांनी त्यांना मुद्दाम खराब खेळण्यासाठी पैसे ऑफर केले होते. परंतु, सीबीआयच्या अंतिम अहवालात कपिल निर्दोष ठरले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Bigg Boss 19’ मध्ये होणार अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री?
आदर्शगाव हिवरे बाजार पुन्हा चर्चेत! गावाला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार