Kashi Temple Offers Milk Prasad – भारताची धर्मनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या काशीमध्ये माँ अन्नपूर्णा मंदिराने एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. मंदिरात ० ते १ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना विशेष प्रसाद दिला जात आहे. असा प्रसाद देणारे हे देशातील पहिलेच मंदिर आहे.
मंदिराचे महंत शंकर पुरी महाराज यांनी ही नवीन परंपरा सुरू केली आहे. या नवीन परंपरेनुसार,नवजात आणि लहान मुलांना गीर गायीचे ताजे दूध वाटप केले जात आहे.
दर्शन घेताना लहान मुलांना भुकेमुळे होणारी बेचैनी आणि रडण्याची समस्या लक्षात घेऊन ही अनोखी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. महंत शंकर पुरी महाराज म्हणाले की, काशीमध्ये आलेला कोणीही उपाशी राहू नये, याच भावनेतून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मंदिराच्या आश्रमातील उत्कृष्ट गीर गाईचे दूध दररोज सकाळी आणि संध्याकाळी वितरित केले जात आहे. या उपक्रमाने लहान बालकांसाठी प्रसादाची सोय झाली आहे. त्यामुळे आता बालकांचे आई-वडीलदेखील लांब रांगेत बराच वेळ उभे राहून दर्शन घेताना अस्वस्थ होणार नाहीत.
दररोज जवळपास १०० हून अधिक भाविक आपल्या मुलांसाठी हा दुधाचा प्रसाद घेण्यासाठी मंदिरात येत आहेत. लहान मुलांच्या पालकांनी मंदिर प्रशासनाच्या या अनोख्या उपक्रमाचे खूप कौतुक केले आहे.
हे देखील वाचा –
आता मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्यांना पालिका लाखोंची बक्षिसे देणार
कोकणात १५ वर्षांत एकही धरण नाही! नीलेश राणेंचा आरोप
मनरेगाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव; महात्मा गांधी ऐवजी पूज्य बापू









