Home / News / Kashi Vishwanath : काशी विश्वनाथ मंदिर कर्मचारी राज्य सेवक दर्जा ! पगार तिपटीने वाढणार

Kashi Vishwanath : काशी विश्वनाथ मंदिर कर्मचारी राज्य सेवक दर्जा ! पगार तिपटीने वाढणार

Kashi Vishwanath Temple Staff Granted State Government Employee Status Kashi Temple Staff Get Govt Status – श्री काशी विश्वनाथ मंदिर...

By: Team Navakal
Kashi Temple Staff Get Govt Status

Kashi Vishwanath Temple Staff Granted State Government Employee Status

Kashi Temple Staff Get Govt Status – श्री काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple)न्यासाने ऐतिहासिक निर्णय घेत पुजारी व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी सेवकाचा (government employee) दर्जा दिला आहे. परिणामी त्यांच्या पगारात तिपटीने वाढ होणार आहे. मंदिर राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आल्यानंतर (१९८३) सेवाशर्तींमध्ये झालेला हा पहिला मोठा बदल आहे.

नवीन नियमावलीनुसार पुजाऱ्यांचा मासिक पगार जवळपास तिपटीने वाढणार आहे. इतर कर्मचाऱ्यांनाही विविध भत्ते व सुविधा देण्यात येणार आहेत. त्यामुळे काशी मंदिरातील कर्मचारी उत्तर प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीवर येणार आहेत. देशातील बहुसंख्य पुजारी हे सरकारी सेवक म्हणून गणले जात नाहीत, अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश सरकारने उचललेले हे पाऊल राष्ट्रीय स्तरावरही महत्त्वाचे ठरणार आहे.

याशिवाय, न्यासाने अनेक विकासकामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये वैदिक शिक्षण संस्था स्थापन करणे, मुख्य मंदिर व विश्वलक्ष्मी माता मंदिर यांच्यात थेट मार्ग तयार करणे, संकट हरण हनुमान मंदिराचा विकास करणे तसेच सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करणे यांचा समावेश आहे. मंदिर परिसरात नवे डिजिटल संग्रहालय उभारणे, भाडे दर व कर्मचारी भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

सिद्धिविनायक मंदिराचा १०० कोटींचा विस्तार मार्गी

चोक्सीला तुरुंगात १४ सुविधा भारताचे बेल्जियमला आश्वासन

वातानुकूलित लोकल डबे खरेदीसाठी जागतिक निविदा

Web Title:
संबंधित बातम्या