Home / News / जीएसटी वाढीचा केरळच्या लॉटरी उद्योगाला फटका

जीएसटी वाढीचा केरळच्या लॉटरी उद्योगाला फटका

GST Hike Blow to Kerala Lottery

Kerala’s Lottery Industry Hit Hard by Proposed GST Hike


GST Hike Blow to Kerala Lottery – केंद्र सरकारकडून लॉटरी व्यवसायावर ४० टक्के जीएसटी (GST)अर्थात वस्तू व सेवा कर आकारणी करण्याच्या प्रस्तावामुळे केरळमधील (Kerala)लॉटरी व्यवसायाला(lottery sector) मोठा फटका बसणार आहे. यामुळे लॉटरीच्या तिकीटांची विक्री कमी होऊन या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण होणार आहे. केरळचे अर्थमंत्री के.एन.बालगोपाल(Kerala Finance Minister K.N. Balagopal) यांनी या बद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

केरळमध्ये लॉटरी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. या व्यवसायावर राज्यातील २ लाख एजंट व दुकानदार अवलंबून आहेत. जीएसटी वाढीमुळे तिकीटांचे दर वाढवण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे त्याच्या विक्रीवर परिणाम होणार आहे. हा प्रश्न आपण येत्या ३ व ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी परिषदेत उपस्थित करणार असल्याचे बालगोपाल यांनी म्हटले आहे. ३८ व्या जीएसटी परिषदेत लॉटरीवर सरसकट २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर अचानक हा धोरणात्मक बदल करण्यात आला. केरळचा लॉटरी उद्योग हा देशातील सगळ्यात मोठा असून तो देशातील एकूण व्यवसायाच्या ९७ टक्के आहे. लॉटरी व्यवसायातून गेल्या आर्थिक वर्षात केरळला १४ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

जीएसटीमध्ये वाढ केल्यास केरळच्या करमहसुलावर मोठा परिणाम होणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, यामुळे राज्याचे ८ ते १० हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यात सुरु असलेल्या काही योजनांवरही होणार आहे. कारुण्या आरोग्य विमा योजना व गरीबांसाठीच्या गृहनिर्माण योजनेला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. वाहने, विमा(insurance) आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका राज्यांच्या महसूलाला बसणार आहे.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

स्वारगेट प्रकरणी दत्ता गाडेचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

800 साड्या घेऊन ‘बिग बॉस 19’ मध्ये आलेली तान्या मित्तल कोण आहे? जाणून घ्या

35,000 रुपयांचा स्मार्टफोन फक्त 22,000 रुपयांत! जाणून घ्या Amazon वरील खास ऑफर