Home / News / Khadse – Khevalkar Case : पुणे पोलिसांकडून खडसेंची खेवलकर प्रकरणात चौकशी

Khadse – Khevalkar Case : पुणे पोलिसांकडून खडसेंची खेवलकर प्रकरणात चौकशी

Khadse – Khevalkar Case – प्रांजल खेवलकर (Pranjal Khevalkar)प्रकरणात आज पुणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर...

By: Team Navakal
Khadse - Khevalkar Case

Khadse – Khevalkar Case – प्रांजल खेवलकर (Pranjal Khevalkar)प्रकरणात आज पुणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर यांची दीड तास कसून चौकशी केली.

सिम कार्ड बदली प्रकरणात गुन्हे शाखेच्या नोटीसवरून खडसे यांनी पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी हजेरी लावली होती.

प्रांजल हे रोहिणी यांचे पती असून त्यांना एका पार्टीतून पोलिसांनी अटक केली होती. ६० दिवसांनी त्यांना जामीन मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणातील काही महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

खेवलकर यांना वाचवण्यासाठी खडसे यांनी काही कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे. याच अनुषंगाने ही नोटीस बजावण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

या चौकशीनंतर रोहिणी खडसे-खेवलकर यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकरणाची चर्चा थांबवावी, अशी विनंती केली. त्या म्हणाल्या की, ही न्यायालयीन लढाई आहे. न्यायालयातल्या लढाईची सगळी माहिती तुमच्यासमोर येईल.

सत्य बाहेर येईल. ही लढाई आम्ही जिंकूच. माझ्या दोन लहान मुलांच्या वतीने माझी विनंती आहे, की आपण याबद्दल फार चर्चा करू नये. ही चर्चा थांबवावी. हा कौटुंबिक विषय आहे. माझ्या चिमुकल्यांवर याचा मानसिक परिणाम होत आहे.

महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवाज उठवावा. राजकारण करताना कोणाचे आयुष्य खराब होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. खेवलकर यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थाचे सेवन केले नव्हते, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.


हे देखील वाचा –

मंत्री कोकाटेंची रोहित पवारांच्या विरोधात कोर्टात धाव!

इंदू मिल स्मारक पुतळा प्रतिकृतीत दोष?डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखा दिसतच नाही!

टीव्ही कार्यक्रमात जाहिरातींची अडचण?पुण्यातील आजीबाईंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार….

Web Title:
संबंधित बातम्या