Kokate Sues Rohit Pawar – तत्कालीन कृषिमंत्री आणि सध्याचे क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा खळबळ माजली होती.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणत मंत्री कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याच प्रकरणात आता कोकाटेंनी न्यायालयात धाव घेत रोहित पवारांच्या माफीनाम्याची मागणी केली आहे.
तसेच मला रमी खेळता येत नाही, असा दावा नाशिक न्यायालयात केला आहे. या प्रकरणी ९ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
क्रीडामंत्री कोकाटेंनी आज न्यायालयात आपला जबाब नोंदवला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. ते म्हणाले की, हे आरोप झाले तेव्हा मी माझी भूमिका माध्यमांसमोर मांडली. मी रमी खेळत नव्हतो.
मला रमी खेळता येत नाही. त्यानंतरही रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करणे चालू ठेवले. त्यानंतर मी आमचे वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत पवार यांना नोटीस पाठवली. संबंधित व्हिडिओ विधान परिषदेमधील आहे.
रोहित पवार विधानपरिषदेचे सदस्य नाहीत आणि त्यांना परिषदेत येण्याची परवानगी नाही, तर मग हा फोटो नेमका कुणी काढला? त्याचे नाव काय आहे? त्यांना हा फोटो कसा आणि कुठून मिळाला? याची चौकशी व्हावी.
ते पुढे म्हणाले की, या व्हिडिओमुळे शेतकऱ्यांमध्ये, माझ्या पक्षामध्ये माझी बदनामी झाली आहे. माझ्या पक्षाच्या नेत्याची बदनामी झाली आहे. पर्यायाने माझीही बदनामी झाली आहे. माझी प्रतिमा डागाळली गेली आहे.
अशा परिस्थितीत तुम्ही आमची माफी मागावी, असी नोटीस मी त्यांना पाठवली. पण त्यांनी त्या नोटीसची खिल्ली उडवली. अशावेळी माझी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी मला न्यायालयात याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय नव्हता.
हे देखील वाचा –
इंदू मिल स्मारक पुतळा प्रतिकृतीत दोष?डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखा दिसतच नाही!
टीव्ही कार्यक्रमात जाहिरातींची अडचण?पुण्यातील आजीबाईंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार….
दिवाळीनिमित्त टाटाची ‘नेक्सॉन’वर खास ऑफर; खरेदीवर होईल लाखो रुपयांपर्यंतची बचत; पाहा डिटेल्स