Home / News / Koyna Victims Await Justice : कोयना धरणग्रस्तांची परवड ६५ वर्षानंतरही पूर्ण हक्क नाही

Koyna Victims Await Justice : कोयना धरणग्रस्तांची परवड ६५ वर्षानंतरही पूर्ण हक्क नाही

Koyna Victims Await Justice – कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला ६५ वर्षे झाली तरी अद्याप त्यांना पूर्ण हक्कमिळालेले नाहीत. यामागे प्रशासकीय...

By: Team Navakal
Koyna Victims Await Justice

Koyna Victims Await Justice – कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला ६५ वर्षे झाली तरी अद्याप त्यांना पूर्ण हक्क
मिळालेले नाहीत. यामागे प्रशासकीय मानसिकता जबाबदार असल्याचे मत प्रभाव महासंघाचे अध्यक्ष प्रवीण साळुंखे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांचे प्रलंबित प्रश्न घेऊन लढणाऱ्या महाराष्ट्रातील प्रकल्प प्रभाव महासंघ प्रकल्पग्रस्त कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कोयनानगर नवीन विश्रामगृह येथे नुकतीच आयोजित केली होती.

या बैठकीस जावळी, महाबळेश्वर आणि पाटण तालुक्यातील महासंघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेतील तांत्रिक बाबींवर चर्चा करून पुढील रणनीती ठरविण्यात आली.

यावेळी महासंघाचे प्रविण साळुंखे म्हणाले की,अलीकडे सरकारी प्रतिनिधींनी पुनर्वसन प्रश्नाबाबत सहकार्याची भूमिका घेतली आहे. बैठकींचा सपाटा देखील विविध जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. मात्र,पुनर्वसन प्रश्नास म्हणावे तेवढे यश मिळत नसल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे.

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला ६५ वर्षे झाली तरी पूर्णतः हक्क मिळाले नाहीत. याला प्रशासकीय मानसिकता जबाबदार आहे.या बैठकीत जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.


हे देखील वाचा –

यंदा शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी साजरी करणार ! शरद पवारांची माहिती

गोमांस विक्रीवरून दोन गटात राडा; अकोल्यात तणावाचे वातावरण..

Gopichand Padalkar : पडळकरांच आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य; हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये..

Web Title:
संबंधित बातम्या