कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नेटवर्क वाढवणार- CM Fadanvis

Kumbh Mela, road network to be expanded: CM Fadnavis

Kumbh Mela 2027- road network to be expanded

नागपूर – २०२७ मध्ये नाशिक (Nashik)आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) पार्श्वभूमीवर राज्यात रस्त्यांचे जाळे (Road network )वाढवले जाणार, अशी माहिती (CM Fadanvis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय रस्ते-वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी कुंभमेळा नियोजनाच्या दृष्टीने मी राष्ट्रीय महामार्ग बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्याच अनुषंगाने (cabinet minister Nitin Gadkari)केंद्रीय रस्ते-वाहतूक मंत्री गडकरी यांनी बैठक घेतली. या बैठकीत आम्ही आठ-नऊ रस्त्यांची मागणी केली . ते सर्व रस्ते त्यांनी मंजूर केले आहेत. त्यामध्ये रिंगरोड, त्र्यंबकेश्वरला जाणारा रस्ता आणि सहा बाजूने नाशिकच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. त्या सर्व रस्त्यांच्या कामकाजांनाही त्यांनी मान्यता दिली आहे.याशिवाय या बैठकीत नागपूरच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला . त्यामध्ये नाग नदीवरील जायका फंडेड प्रोजेक्ट आणि तेथील भूमिगत वीज वाहिन्या , खासगी बससाठी बाहेर वाहनतळ अशा अनेक विषयांबाबत निर्णय घेतले.