Home / News / लाडक्या बहिणीचा निधी वाढवणार ! मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

लाडक्या बहिणीचा निधी वाढवणार ! मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने (Mahayuti government’) राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या (Laadki Bahin scheme)रकमेत अद्याप वाढ...

By: Team Navakal
Is RSS a banned organization? CM responds to criticism

मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने (Mahayuti government’) राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या (Laadki Bahin scheme)रकमेत अद्याप वाढ झालेली नाही. निवडणुकीदरम्यान काही नेत्यांनी या रकमेत वाढ करण्याची आश्वासने दिली होती. पण जवळपास वर्ष उलटूनही रकमेत वाढ झाली नाही. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis)यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत योग्य वेळी वाढ कारणार अशी घोषण केली आहे. रक्षाबंधनानिमित्त मुलुंडमध्ये (Mulund) आयोजित लाडक्या बहिणींचा देवाभाऊ (Devabhau) या कार्यक्रमात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही लाडक्या बहिणींसाठी चांगले प्रयत्न करत असताना काही सावत्र भाऊ (stepbrothers)त्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. योजनेविरोधात ते न्यायालयात गेले, पण काही साध्य झाले नाही. म्हणून योजनेत भ्रष्टाचार झाला असा आरोप केला. योजनेतला निधी सरकारच्या खात्यातून थेट लाभार्थी बहिणींच्या खात्यात (bank accounts)जातो. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्नच नाही. भ्रष्टाचार (corruption)त्यांच्या डोक्यात आहेप्रामाणिक लाभार्थी भगिनींना आम्ही हा लाभ देत राहणार आहोत. कोणी कितीही खोटे आणि चुकीचे बोलले तरी बहिणींचे आशीर्वाद सख्ख्या भावांच्या पाठिशीच राहतात. सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्र भावांसारखे वागतील, तोपर्यंत बहिणी त्यांना थारा देणार नाहीत. पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहील आणि योग्य वेळी निधीत वाढही होईल.

Web Title:
संबंधित बातम्या