Home / News / Manali Landslideमनालीमध्ये भूस्खलन झाल्याने लेह-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग बंद

Manali Landslideमनालीमध्ये भूस्खलन झाल्याने लेह-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग बंद

Landslide in Manali Blocks Leh-Chandigarh National Highway शिमला – हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे २९१ रस्ते बंद झाले आहेत. मनाली येथे...

By: Team Navakal
Landslide in Manali Blocks Leh-Chandigarh National Highway

Landslide in Manali Blocks Leh-Chandigarh National Highway

शिमला – हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे २९१ रस्ते बंद झाले आहेत. मनाली येथे भूस्खलन झाल्याने (Leh Chandigarh highway closed)चंदीगड-मनाली-लेह राष्ट्रीय महामार्गही बंद झाला आहे. (Manali landslide)राज्यात विविध अपघातांमध्ये आतापर्यंत ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. (Ganga and Yamuna floods)तसेच या नैसर्गिक आपत्तीमध्ये १५०० घरांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा अमरनाथ यात्रेवरदेखील परिणाम झाला असून यात्रा उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.(Landslide in Himachal Pradesh)

पहलगाम आणि बालटाल या यात्रेच्या दोन मार्गांवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. (Prayagraj flood update
)काल सकाळी बालटाल(Amarnath Yatra suspended) मार्गावरून यात्रा सुरू करण्यात आली होती. परंतु मुसळधार पावसामुळे यात्रा पुन्हा थांबवण्यात आली. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे गंगा, यमुना आणि बेतवा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. प्रयागराजमधील सलोरी, गोविंदपूर या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथे सुमारे १०,००० घरे २ ते ३ फूट पाण्याखाली आहेत. काशीतील सर्व ८४ घाट पाण्यात बुडाले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts