Home / News / Manhas Becomes BCCI Chief : जम्मू-काश्मीरचे मिथुन मन्हास  बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

Manhas Becomes BCCI Chief : जम्मू-काश्मीरचे मिथुन मन्हास  बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

Manhas Becomes BCCI Chief – केंद्रीय मंत्री भाजपाचे जितेंद्र सिंग यांच्या जम्मू- काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील क्रिकेटपटू, प्रशिक्षक व जम्मू-काश्मीर क्रिकेट...

By: Team Navakal
Manhas Becomes BCCI Chief


Manhas Becomes BCCI Chief – केंद्रीय मंत्री भाजपाचे जितेंद्र सिंग यांच्या जम्मू- काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील क्रिकेटपटू, प्रशिक्षक व जम्मू-काश्मीर क्रिकेट मंडळाचे प्रशासक मिथुन मन्हास (Mithun Manhas)यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या (BCCI)अध्यक्षपदी आज बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईत झालेल्या मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करण्यात आली.

काश्मीरला प्रथमच हा मान मिळाला आहे. प्रशिक्षक व स्थानिक खेळाडू म्हणून प्रदीर्घ कार्यकाळ असला तरी एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना न खेळलेले बोर्डाचे ते पहिले अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीनंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी पोस्टद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.
बीसीसीआयचे आधीचे अध्यक्ष क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे राजीनामा दिला होता.

तेव्हापासून बीसीसीआयच्या आगामी अध्यक्षपदासाठीची चर्चा सुरू झाली. विक्रमवीर सचिन तेंडुलकर यांचेही नाव चर्चेत आले होते. याबरोबरच सौरव गांगुली, किरण मोरे व कोषाध्यक्ष व कर्नाटकचे खेळाडू रघुराम भट यांचीही नावे चर्चेत आली.

त्यानंतर गेल्या महिन्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत अचानक मिथुन मन्हास यांचे नाव समोर आले. त्याला उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाठिंबा दिला. त्याचवेळी त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जवळ जवळ निश्चित झाले होते. त्याची औपचारिकता आज पूर्ण झाली व त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.
मिथुन मन्हास हे जम्मू काश्मीरच्या डोडा  जिल्ह्यातील असून, त्यांनी शालेय जीवनापासूनच क्रिकेटची सुरुवात केली. 14, 16 व 19 वर्षांखालील भारतीय संघात त्यांची निवड झाली होती. त्यानंतर त्यांची दिल्लीच्या रणजी संघातही निवड झाली.

2007-2008 साली दिल्ली संघाने रणजी ट्रॉफी जिंकली होती. त्या संघात मन्हास होते. त्यांनी दिल्ली डेअरडेविल्स व पुणे वॉरियर्स व चेन्नई सुपरकिंग्ज या संघामधून आयपीएलचे सामनेही खेळलेले आहेत. मन्हास यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 9 हजार 714 धावा केल्या असून, त्यात 27 शतके व 49 अर्धशतकांचा समावेश आहे.  

आज झालेल्या बैठकीत मन्हास यांची अध्यक्षपदी तर राजीव शुक्ला यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. कोषाध्यक्षपदी माजी भारतीय फिरकी गोलंदाज रघुराम भट यांची निवड करण्यात आली आहे. देवजित सैकिया यांची सचिवपदी तर प्रभतेज भाटिया यांची संयुक्त सचिव म्हणून निवड करण्यात आली.


हे देखील वाचा – 

सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांना डावलून मिथुन मन्हास यांची BCCI अध्यक्षपदी निवड का झाली?

पाकिस्तान तिसऱ्यांदा चारीमुंड्या चीत भारतीय संघाने आशिया चषक जिंकला

पंतप्रधान मोदींच्या सभेत ‘ती’ एक चूक; थेट IAS अधिकाऱ्याला पदावरून हटवले

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या