Manoj Jarange Patil Admitted to Hospital; Health Critical, 15 Days’ Rest Advised
Jarange Admitted to Hospital – आझाद मैदानावरील (Azad Maidan) पाच दिवसांचे उपोषण संपवून मराठा आरक्षणाचे (maratha reservation)नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) कालच रूग्णवाहिकेने संभाजीनगरला रवाना झाले. येथील गॅलेक्सी रूग्णालयात (Galaxy Hospital) दाखल करण्यात आले. सलग पाच दिवस पोटात अन्नपाणी न गेल्याने शरीर अशक्त झाले आहे. त्यामुळे आज डॉक्टरांनी त्यांना १५ दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.(complete rest for 15 days)
सध्या जरांगे पाटील यांच्यावर गॅलेक्सी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या आवश्यक त्या सर्व तपासण्या करण्यात आल्या आहेत. उपोषणामुळे त्यांना प्रचंड थकवा जाणवतोय, तसेच त्यांची स्थिती नाजूक असल्याची माहिती डॉक्टर विनोद चावरे यांनी दिली. जरांगे पाटील यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी दोन-तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, असेही ते म्हणाले.
डॉ. चावरे यांच्या मते, उपोषणामुळे जरांगे पाटील यांना प्रचंड थकवा जाणवतोय. चक्कर येणे, पोटदुखी यासारख्या तक्रारी आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील दोन ते तीन आठवडे वैद्यकीय देखरेखीखाली राहणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाल्यानंतर काल रात्री जरांगे पाटलांचे रुग्णालयाबाहेर मराठा समाजाकडून जंगी स्वागत करण्यात आले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
राज्यातील विविध परिवहन प्रकल्पांच्या खर्चाला मंजूरी
11व्या शतकातील अंबरनाथमधील शिवमंदिर धोक्यात! बेकायदेशीर बांधकामाचा आरोप; नेमका वाद काय?
61 लाख रुपयांचा क्लेम नाकारला? विमा कंपनी वादाच्या भोवऱ्यात; टीका होताच दिले स्पष्टीकरण