Home / News / Manoj Jarange Slams Munde Siblings : रक्ताने हात माखलेल्यांनी जातीवर बोलू नये! जरांगेंचा मुंडेंना इशारा!

Manoj Jarange Slams Munde Siblings : रक्ताने हात माखलेल्यांनी जातीवर बोलू नये! जरांगेंचा मुंडेंना इशारा!

Manoj Jarange Slams Munde Siblings – रक्ताने हात माखलेल्यांनी आमच्या जातीवर बोलू नये, असा इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे...

By: Team Navakal
Manoj Jarange Slams Munde Siblings

Manoj Jarange Slams Munde Siblings – रक्ताने हात माखलेल्यांनी आमच्या जातीवर बोलू नये, असा इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दिला. काल भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात भाजपा मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी आरक्षणाला विरोध नाही, मात्र आमच्या ताटातले घेऊ नका, असे वक्तव्य केले होते.

तर धनंजय मुंडेंनी (Dhanajay Munde)काही लोक आरक्षणाच्या आडून ओबीसीमधून (OBC Reservation) आरक्षण घ्यायचे बघत आहेत, अशी टीका केली होती. यावरून आज जरांगेंनी मुंडे भावंडांवर कडाडून टीका केली.

येथी पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही बंजारा समाजातून आरक्षण घेतले. त्यांच्या पाच टक्के जागा खाल्ल्या, मग आम्हाला काय बोलता? ओबीसी खायचे म्हणता, पण तुम्ही बंजारा समाजाचे खाल्ले.

रक्ताने हात माखलेल्यांनी माझ्या जातीवर बोलायचे नाही. मी दोघांचाही बाजार उठवेन. छगन भुजबळांच ऐकून माझ्या जातीच्या नादी लागू नको.

कुणबी प्रमाणपत्र काढण्याबद्दलही त्यांनी भाष्य केले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मराठवाड्यात कुणबीच्या सुमारे ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी पाहून समान आडनाव असेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे होणार आहे. त्यामुळे समान आडनाव असेल तर शपथपत्र घ्या आणि प्रमाण पत्र घ्या.


हे देखील वाचा – 

मीराबाई चानूचे वर्ल्ड वेटलिफ्टिंगमध्ये दमदार पुनरागमन! 199KG वजन उचलत जिंकले रौप्य पदक

मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन! गौतम अदानींची घोषणा

राज ठाकरेंशी युती कायम राहणार उद्धव ठाकरेंची पुन्हा जाहीर ग्वाही

Web Title:
संबंधित बातम्या