Home / News / Marathi U-Turn: Azmi Seeks Cover आझमींना अखेर उपरती

Marathi U-Turn: Azmi Seeks Cover आझमींना अखेर उपरती

Marathi U-Turn: Azmi Seeks Cover – मराठी कशाला बोलू म्हणणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना चौफेर टीकेनंतर उपरती झाली...

By: Team Navakal
Marathi U-Turn: Azmi Seeks Cover

Marathi U-Turn: Azmi Seeks Cover – मराठी कशाला बोलू म्हणणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना चौफेर टीकेनंतर उपरती झाली आहे. आता त्यांनी माझे मराठीवर प्रेम असून माझ्याशी मराठीत बोला, अशी सावध भूमिका घेतली आहे.

भिवंडीत मराठीत कशाला बोलू, असा उलट सवाल करणाऱ्या आझमींना मनसेने आपल्या स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता.

या सगळ्या वादानंतर आमदार आझमी यांनी खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या खुलाशात सांगितले की, मी बोलत होतो. तिथे संपूर्ण देशातले माध्यम प्रतिनिधी होते. देशभर मराठी बोलली जात नाही, म्हणून मी मराठी बोलू शकतो, मात्र इथे गरज नाही, असे म्हणालो.

मी मराठीद्वेष्टा नाही. महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राची भाषा मराठी असून मी तिचा सन्मान म्हणून मराठी शिकत आहे. माझे शिक्षण मराठीतून झाले नाही. त्यामुळे मी हिंदीत बोलत होतो.

आपल्या मराठी शिकण्याबद्दल ते म्हणाले की, मी कोणाच्या दबावापोटी किंवा भीतीने मी मराठी शिकत नाही. रोज ऑनलाईन शिक्षकांकडून मराठी शिकत आहे.

चुराना-चोरणे, घुसना-घुसणे, गिरना-पडणे असे शब्द शिकत आहे. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनाही मी माझ्याशी मराठीतच बोला, असे सांगितले आहे.

तत्पूर्वी, मराठी-हिंदीमध्ये फरक काय आहे? मी मराठीत बोलू शकतो. पण मराठीत बोलण्याची गरज काय? ही भिवंडी आहे, असे वादग्रस्त वक्तव्य आझमी यांनी केले होते. पत्रकारांनी मराठी बोला, असे सांगितल्यानंतर आझमींनी हे विधान केले होते.


हे देखील वाचा –

 पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका आता लांबणीवर!३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत

नवज्योतसिंग सिद्धूची पत्नी पुन्हा विधानसभा लढवणार

आदित्य ठाकरेंची नाईट लाईफ संकल्पना भाजपने स्वीकारली!२४ तास दुकाने खुली राहणारे

Web Title:
संबंधित बातम्या