Home / News / Mehul Choksi : चोक्सीला तुरुंगात १४ सुविधा भारताचे बेल्जियमला आश्वासन

Mehul Choksi : चोक्सीला तुरुंगात १४ सुविधा भारताचे बेल्जियमला आश्वासन

Mehul Choksi to Get 14 Facilities in Jail; India Assures Belgium Mehul Choksi’s Jail Assurances – पंजाब नॅशनल बँक (PNBscam)...

By: Team Navakal
Choksi’s Jail Assurances

Mehul Choksi to Get 14 Facilities in Jail; India Assures Belgium

Mehul Choksi’s Jail Assurances – पंजाब नॅशनल बँक (PNBscam) घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी (diamond trader) मेहुल चौक्सीला बेल्जियमहून भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. भारतात आणल्यानंतर चोक्सीला कारावासात कसे ठेवले जाईल, याबद्दल गृह मंत्रालयाने पत्र लिहून बेल्जियम (Belgium) सरकारला आश्वासन दिले. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याला वैद्यकीय सोयीसह १४ सुविधा दिल्या जातील. सध्या बेल्जियममधील न्यायालयात त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे. भारताचे हे आश्वासन या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

गृह मंत्रालयाच्या पत्रानुसार, मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातल्या बराक क्रमांक १२ मध्ये चोक्सीला ठेवले जाईल. तिथल्या एका कोठडीत ६ जणांना ठेवले जाते. सध्या तिथल्या दोन कोठड्या रिकाम्या आहेत. चोक्सीवर १३,८५० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी तो २०१८ पासून फरार आहे. त्याचा भाचा नीरव मोदीही या प्रकरणात आरोपी आहे. भारतीय तपास संस्थांच्या आवाहनावरून चोक्सीला गेल्या १२ एप्रिल रोजी बेल्जियममध्ये अटक करण्यात आली होती.

भारत सरकारने बेल्जियम न्यायालयामध्ये दिलेल्या हमीपत्रात म्हटले आहे की, कोठड्यांमध्ये लोखंडी जाळ्या (ग्रील) असलेल्या खिडक्या, व्हेंटिलेटर आणि सीलिंग फॅन लावलेले आहेत. मुंबईचे हवामान वर्षभर आल्हाददायक असते आणि फारशी उष्णताही जाणवत नाही. त्यामुळे कोठड्यांमध्ये एअर कंडिशनरची सुविधा नाही. नेहमी त्याची गरजही भासत नाही. कोठड्यांमध्ये दररोज झाडलोट केली जाते. स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष दिले जाते. नियमित स्वच्छता, कीटकनियंत्रण (पेस्ट कंट्रोल) आणि महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो. वेगळी अशी अटॅच्ड शौचालय व स्नानगृह सुविधा आहे. तसेच कोठडीच्या मध्येही आंघोळीची सोय आहे.

चोक्सीला स्वच्छ पाणी, चांगली झोपायची सोय (गादी, उशी, ब्लँकेटसह), फळे, घरगुती जेवण आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा मिळतील. २४ तास वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असतील आणि त्याला आवश्यक असल्यास सरकारी रुग्णालयात नेले जाईल. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, विशेष आहाराची गरजही भागवली जाईल. अंगणात व्यायाम करण्यास परवानगी आहे आणि घरातील मनोरंजनासाठी बोर्ड गेम आणि बॅडमिंटनसारखे खेळ उपलब्ध आहेत. जेलमध्ये योगा, ध्यान आणि वाचनालयाची सुविधाही आहे, असे हमीपत्रात म्हटले आहे.

या पत्रात पुढे म्हटले, की आर्थर रोड तुरुंगात २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. यामध्ये सहा वैद्यकीय अधिकारी, परिचारिका (नर्स), फार्मासिस्ट आणि लॅबोरेटरी सहाय्यक उपलब्ध आहेत. आयसीयूसह २० खाटांचे एक जेल हॉस्पिटलही आहे आणि आपत्कालीन परिस्थितीत सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सर जे. जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये रुग्णाला पाठवता येते. कैद्यांना स्वतःच्या खर्चावर खाजगी वैद्यकीय सुविधा घेण्याचीही मुभा आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा – 

सणासुदीच्या गर्दीचा प्रश्न सुटला! मध्य रेल्वेने जाहीर केल्या विशेष ट्रेन, लगेच तिकीट बुक करा

लाँचिंगपूर्वीच iPhone 16 Pro झाला स्वस्त! हजारो रुपयांची बंपर सूट; पाहा डिटेल्स

नवी मुंबई विमानतळाला नाव द्या; रविवारी दिबा मानवंदना कार रॅली

Web Title:
संबंधित बातम्या