दिलीप कुमार व राज कपूरचे पाकिस्तानात स्मारक होणार

Memorials for Dilip Kumar and Raj Kapoor to Be Built in Pakistan

Memorials for Dilip Kumar and Raj Kapoor to Be Built in Pakistan

पेशावर – पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील दिलीप कुमार व राज कपूर यांच्या घरांचे स्मारक करण्याचा (Dilip Kumar Memorial Pakistan)व त्यांचा पेशावर ते मुंबई या प्रवासाची माहिती देणारे प्रदर्शन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. खैबर पख्तुनख्वा सरकारने या स्मारकांसाठी ३३.८ कोटी रुपयांच्या योजनेला मंजूरी दिली आहे.(Indian cinema history Pakistan)
प्रांताचे(Indian actors heritage Pakistan) मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर व पर्यटन व पुरातत्व विभागाचे सल्लागार झाहीद खान शिनवारी यांनी या स्मारकांसाठी जागा ताब्यात घेण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. या प्रांतातील पर्यटन वाढीसाठी या प्रस्तावाला मंजूरी देण्यात (Raj Kapoor birthplace Pakistan)आली असून जागतिक बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. राज कपूर व दिलीप कुमार यांची घरे पाकिस्तानी सरकारने याआधीच राष्ट्रीय संरक्षित वास्तू म्हणून घोषित केल्या आहेत.(Pakistani tribute to Bollywood)
या दोन्ही अभिनेत्यांची घरे २०१४ मध्ये संरक्षित राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित करण्यात आली होती. राज कपूर यांच्या ढाकी दाल गरन विभागातील घराची किंमत ११.५ कोटी रुपये असून दिलीप कुमार यांच्या मोहल्ला खुदाद येथील घराची किंमत ७.२ कोटी रुपये आहे.