Home / News / Metro Line 3 Luggage Hassle : मुंबई मेट्रो ३ मार्गावर सामानाची ने-आण करताना प्रवाशांची दमछाक

Metro Line 3 Luggage Hassle : मुंबई मेट्रो ३ मार्गावर सामानाची ने-आण करताना प्रवाशांची दमछाक

Metro Line 3 Luggage Hassle – मुंबई मेट्रोची ॲक्वा लाईन म्हणून ओळखला जाणारा मेट्रो मार्ग ३ नुकताच मुंबईकरांच्या सेवेत रुजू...

By: Team Navakal
Metro Line 3 Luggage Hassle

Metro Line 3 Luggage Hassle – मुंबई मेट्रोची ॲक्वा लाईन म्हणून ओळखला जाणारा मेट्रो मार्ग ३ नुकताच मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाला. पण दोन आठवड्यांतच मुंबईकरांच्या सोयीसाठी सेवेत दाखल झालेल्या या मार्गामुळे सोय कमी आणि गैरसोयच जास्त होत असल्याचा सूर प्रवाशांतून व्यक्त होत आहे.

विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक दमछाक होताना दिसत आहे. कारण सरकते जिने बंद असतात आणि लिफ्ट चालत नाहीत. त्यामुळे विमान प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करताना २५-२५ किलो वजनाच्या बॅगा हातात उचलून न्याव्या लागत आहेत.

दोन आठवड्यांपूर्वीच लोकार्पण करण्यात आलेल्या ॲक्वा लाईनमुळे मेट्रोसेवा थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमए) टर्मिनल १ आणि २ ला जोडण्यात आली. यामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल, असे म्हटले गेले. पण दोनच आठवड्यात उलट चित्र समोर आले आहे.

प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ, वयस्क नागरिकांना जिना चढ-उतार करताना सामान हातातच घेऊन जावे लागत आहे. टर्मिनल १ आणि २ स्थानकांवरून बाहेर पडताना लिफ्ट आणि एस्केलेटरची पुरेशी उपलब्धता नाही किंवा असतील तर ते कार्यकरत नसल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आशियातील सर्वोत्तम भूमिगत मेट्रो मार्गांपैकी एक असूनही प्रवाशांवर मोठी बॅग आणि सुटकेस हाताने ओढत नेण्याची वेळ येत आहे. सोशल मीडियातून या सगळ्या गैरसोयीबद्दल प्रवासी रोष व्यक्त करत आहेत.

एका संतप्त प्रवाशाने एक्सवर आपला अनुभव सांगताना म्हटले की, टी-१ स्थानकावर तपासणी केलेले सामान हातात घेऊन जाताना अक्षरशः दमछाक होत आहे. कारण तिथे एस्केलेटर आणि लिफ्ट उपलब्ध नाही. ही काही आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा नाही.

मेट्रोचा उद्देश आणि सुरू असलेली अंमलबजावणी यामध्ये मोठी तफावत असल्याकडेही प्रवाशांनी लक्ष वेधले. टी-२ येथे उतरल्यानंतर प्रवाशांना विमानतळ आगमन/प्रस्थान गेटपर्यंत जाण्यासाठी सुमारे ५०० मीटर पायपीट करावी लागते आणि टी-१ येथे सुमारे २०० मीटर चालावे लागते, तसेच सामान घेऊन जिने चढावे लागतात.


हे देखील वाचा – 

१०० कोटींचा हिरा नाही, तो तर एक साधा दगडच! पन्नाच्या दगडाची तपासणी

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी केली शिफारस

सदा सरवणकरांची थोरली सून आहे मराठमोळी अभिनेत्री..

Web Title:
संबंधित बातम्या