Home / News / MiG-21 Fighter Jet Retire : मिग-२१ लढाऊ विमान उद्या निवृत्त होणार

MiG-21 Fighter Jet Retire : मिग-२१ लढाऊ विमान उद्या निवृत्त होणार

MiG-21 Fighter Jet Retire – भारतीय हवाई दलाचा (Indian Air Force)कणा मानल्या जाणाऱ्या मिग-२१ लढाऊ (MiG-21 Fighter Jet)विमानाला 26 सप्टेंबर...

By: Team Navakal
MiG-21 Fighter Jet Retire

MiG-21 Fighter Jet Retire – भारतीय हवाई दलाचा (Indian Air Force)कणा मानल्या जाणाऱ्या मिग-२१ लढाऊ (MiG-21 Fighter Jet)विमानाला 26 सप्टेंबर म्हणजेच उद्या निवृत्ती दिली जाणार आहे.

या विमानाने १९७१ च्या भारत-पाक युद्ध, (1971 India-Pakistan War)कारगिल युद्ध यासारख्या अनेक मोहिमांमध्ये ६२ वर्षांची सेवा भारतीय वायुसेनेत दिली. आता मिग-२१ ची जागा तेजस एलसीए मार्क १ए विमान घेणार आहे.

मिग-२१ जेट भारतीय हवाई दलात १९६३ मध्ये समाविष्ट झाले. हे भारताचे पहिले सुपरसॉनिक जेट होते. ध्वनीच्या वेगापेक्षा जलद उड्डाण करण्याची या विमानाची क्षमता होती.

सध्या राजस्थानमधील बिकानेर येथील नल एअर बेसवर स्क्वॉड्रन्स- ३ स्क्वॉड्रन कोब्रा आणि २३ स्क्वॉड्रन पँथर्स तैनात हे दोन स्क्वॉड्रन्स तैनात आहेत. मिग-२१ ने १९६५, १९७१ आणि १९९९ च्या युद्धांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे.

रशिया आणि चीननंतर भारत हा मिग-२१ चा तिसरा सर्वात मोठा ऑपरेटर देश आहे. रशियाने १९८५ मध्ये मिग-२१ चे उत्पादन थांबवले तरी भारत अद्याप त्याचे आधुनिक प्रकार वापरत आहे.


हे देखील वाचा –

निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारची तरुणांसाठी नवी योजना

चीनविरुद्धच्या युद्धात हवाई दलाला परवानगी नव्हती! सीडीएस अनिल चौहानांचा दावा

अंबाबाईच्या पूजेचे वर्णन संगीत खांबातून ऐकू येते

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या