Home / News / सिंहगडावर बेपत्ता तरुण पाच दिवसांनी सापडला

सिंहगडावर बेपत्ता तरुण पाच दिवसांनी सापडला

पुणे – पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून (Sinhagad Fort) पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला गौतम गायकवाड (२४) काल संध्याकाळच्या सुमारास सापडला. पोलिसांनी दिलेल्या...

By: Team Navakal
Sinhagad Missing youth
Social + WhatsApp CTA

पुणे – पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून (Sinhagad Fort) पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला गौतम गायकवाड (२४) काल संध्याकाळच्या सुमारास सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची तब्येत स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.या प्रकरणात गूढ कायम असल्याने पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास करत आहेत.

गौतम गायकवाड २० ऑगस्ट रोजी महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी या चार मित्रांसह सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. तानाजी कड्याजवळ लघुशंकेसाठी थांबतो असे सांगून तो बाजूला गेला. मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. मित्रांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस व बचावपथकाने शोधमोहीम सुरू केली होती.गौतमचे मित्र त्याच्या दरीत पडल्याचा संशय व्यक्त करत होते. त्यानुसार शोधमोहीम कड्याच्या परिसरात सुरु होती. मात्र या तपासात सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण पळत व लपत असल्याचे दिसले. या फुटेजवरून पोलीस अधिकाऱ्यांना हा प्रकार मुद्दाम घडवल्याचा संशय आला. शोध घेतल्यानंतर काल तो सापडला. गौतमने स्वतः गायब होण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, गौतमवर तब्बल २० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याने त्याला वारंवार वसुलीसाठी धमकीचे फोन येत होते. त्यामुळे गौतमने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला नाही ना? असा संशय व्यक्त होत आहे.


हे देखील वाचा-

श्वानांची हत्या करणाऱ्याचे गावामध्ये उत्साहात स्वागत

बीसीसीआय-ड्रीम ११ फारकत ! ३५८ कोटींचा करार मोडला

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या