MLA Dalvi v/s Sunil Tatkare : उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नोटांच्या बंडलांसह असलेला व्हिडिओ सार्वजनिक केल्यानंतर काल शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनीही शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांचा अशाच प्रकारचा व्हिडिओ समोर आणला.
यानंतर महेंद्र दळवी यांनी, हे सर्व अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनीच कारस्थान असल्याचा आरोप करत तटकरेंचा खरा व्हिडिओ आम्हीही लवकरच बाहेर काढू. त्यानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा इशारा दिला.
दळवी म्हणाले की, मंत्री भरत गोगावले यांच्या संदर्भात शेतकरी पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी जे वक्तव्य केले तेही एआय मॉर्फ केलेले आहे. त्यांच्या भाषणात त्यांनी सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांची नावे घेतली आहेत. याचा अर्थ यामागे कोण आहे, हे स्पष्ट होते.
रायगडमधील तिन्ही आमदारांवर किंवा आमच्या पक्षावर जे बदनामीचे प्रयत्न झाले, त्यामागे तटकरे असल्याचे सिद्ध झाले आहे. एखादे बाहुले उभे करून त्यांच्याकडून वक्तव्य करून घेणे योग्य नाही. तटकरे साहेब प्रगल्भ नेते आहेत, पण अशी बालिश वक्तव्ये त्यांना शोभणारी नाहीत.
ते म्हणतात दुसरा बॉम्ब फोडू, तिसरा फोडू. पण आम्ही एकदा खरा बॉम्ब फोडला, तर हे सारे घरी बसतील. राजकारण म्हणजे भातुकलीचा खेळ नाही. आमच्याकडे त्यांच्या अनेक व्हिडिओंचा पुरावा आहे. तटकरे यांचा खरा व्हिडिओ आतआम्ही बाहेर काढणार आहोत. त्यानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.

शेकापच्या चित्रलेखा पाटलांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन
रायगड- शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी काल मंत्री भरत गोगावले यांचा पैशांच्या बंडलांसह असलेला व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर गंभीर आरोप केले.
यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मंत्री भरत गोगावले यांनी चित्रलेखा पाटील यांच्याविरोधात तक्रार करण्याचा इशारा दिला. आज त्यांच्या समर्थकांनी चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत, जोरदार घोषणाबाजीसह निदर्शने केली.
शिंदे गटाचे माजी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी आरोप केला की, चित्रलेखा पाटील यांना सुनील तटकरे यांनी सुतारवाडीतून सुपारी देऊन आमदार आणि मंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव आखला आहे.
हे देखील वाचा –
बिबट्याला पाळीव प्राणी दर्जा द्या; आ. रवी राणा यांची अजब मागणी









