MNS Opposes Borivali Pigeon Shelter – कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे श्वसनाचे आणि इतर गंभीर आजार लक्षात घेऊन शहरातील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही, बृहन्मुंबई महानगरपालिकेने बोरिवली-गोराई परिसरात नवीन कबुतरखान्यासाठी जागा निश्चित केली आहे.
मात्र, या प्रस्तावित कबुतरखान्याला मनसेने तीव्र विरोध दर्शवला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने या निर्णयाविरोधात आर-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. तसेच, पालिकेने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर स्थानिक स्तरावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
मुंबईतील कबुतरांमुळे वाढत्या आरोग्य समस्यांचा विचार करून उच्च न्यायालयाने शहरातील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या निर्णयाला जैन समाजाकडून तीव्र विरोध झाल्यानंतर न्यायालयाने महापालिकेला लोकवस्तीपासून दूर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते.
त्या पार्श्वभूमीवर पालिकेने चार ठिकाणी कबुतरखान्यांसाठी जागा प्रस्तावित केल्या असून, त्यातील एक जागा बोरिवली-गोराई परिसरात आहे. याच प्रस्तावित ठिकाणी मनसेने कडाडून विरोध दर्शवला असून, या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा –
मुंबईत भाजपाचा प्रचार सुरू ! घरोघरी जाऊन गार्हाणी ऐकणार
२०० कोटींची जमीन लाटली ! सरनाईकांनी आरोप फेटाळला
वंदे भारत ‘कडून रेल्वेच्याभावी पिढीची पायाभरणी ; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार









