Home / News / पुतिन-जिनपिंग यांच्यासोबत मोदींना बघणे लाजीरवाणे ! ट्रम्प सल्लागाराचे मत

पुतिन-जिनपिंग यांच्यासोबत मोदींना बघणे लाजीरवाणे ! ट्रम्प सल्लागाराचे मत

Modi Standing With Xi and Putin Is Shameful – Trump Advisor Navarro

Modi Standing With Xi and Putin Is Shameful – Trump Advisor Navarro

Modi with Xi, Putin Shameful – पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी शांघाय शिखर परिषदेवेळी चीनी (Chinese)राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) आणि रशियन (Russian)राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन(Vladimir Putin) यांची भेट घेतली. अमेरिकेचे (United States) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी भारतावर ५० टक्के कर लादल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीची जगभरात चर्चा आहे. यावरच आता ट्रम्प यांचे व्यापारविषय सल्लागार पीटर नवरो (Navarro)यांनी तिन्ही नेत्यांच्या या भेटीवर आक्षेप घेतला आहे.

ते म्हणाले, शी जिनपिंग आणि व्लादिमिर पुतिन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी उभे राहणे हे लाजिरवाणे आहे. माहीत नाही, ते नेमका काय विचार करत आहेत. आम्हाला आशा आहे, की रशिया नाही, तर आमच्यासोबत आले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात येईल. भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. भारताने चीन आणि रशियासोबत जाण्याची भूमिका घेतल्यास संपूर्ण जगात अशांतता निर्माण होईल. मला कळत नाही, की मोदी रशियन कम्युनिस्टांशी हातमिळवणी का करत आहेत.

यासोबतच नवारो यांनी भारतातील ब्राह्मण समाजावर रशियाकडून तेल खरेदी करून नफेखोरी केल्याचा आरोप लावला. भारतातले ब्राह्मण रशियन तेलातून नफा मिळवत आहे. आणि त्याची किंमत भारतीयांना चुकती करावी लागत आहे. रशियाकडून भारत तेल खरेदी करून युक्रेनवर हल्ला करण्यासाठी पैसे देत आहेत. त्यामुळे भारताला सर्वाधिक करभार सोसावा लागत आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

केसीआर यांच्या कन्या के. कविता बीआरएस पक्षातून निलंबीत

बीडमध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हामागे घेण्यास सुरुवात

वसीम अक्रम की बुमराह; कोण सर्वोत्तम गोलंदाज? पाकिस्तानचा क्रिकेटपटू म्हणाला…