Home / News / Modi to Remain PM Until 2039 : नरेंद्र मोदीच २०३९ पर्यंत पंतप्रधानपदाचा चेहरा ! संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचे वक्तव्य

Modi to Remain PM Until 2039 : नरेंद्र मोदीच २०३९ पर्यंत पंतप्रधानपदाचा चेहरा ! संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचे वक्तव्य

Modi to Remain PM Until 2039: Rajnath Singh’s Statement Modi to Remain PM Until 2039 – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM...

By: Team Navakal
Modi to Remain PM Until 2039

Modi to Remain PM Until 2039: Rajnath Singh’s Statement

Modi to Remain PM Until 2039 – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh)यांनी मोदी हे २०२९ एवढेच नाही, तर २०३९ पर्यंत देशाचे पंतप्रधान राहतील. असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने ७५ वर्षानंतर निवृत्ती होण्याच्या मोदींच्या निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

केंद्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांनी एका मुलाखतीत मोदींचे व्यक्तिमत्व आणि त्यांची कार्यशैली यावर मते मांडली. मोदींच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले राजनाथ सिंहांना निवृत्तीवयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सिंह म्हणाले, पुढची १५-२० वर्षे भाजपामध्ये पंतप्रधानपदासाठी कोणतीही जागा रिक्त नाही.

ते पुढे म्हणाले, मोदी हे कोणत्याही आव्हानाला घाबरत नाहीत, हेच त्यांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे. नोटबंदी, कलम ३७० हटवणे, उरी-बालाकोट सर्जिकल स्ट्राईक ही त्याची काही उदाहरणे आहेत.पंतप्रधान मोदी यांनी १७ सप्टेंबरला ७५ वर्षांचे झाले.

मोदी देशाच्या राजकारणात आले तेव्हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या भाजपामधल्या मातब्बरांना मार्गदर्शक मंडळात टाकण्यात आले. वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त सक्तीची निवृत्ती देण्यात आली. त्यामुळे भाजपाने देशाच्या राजकारणात निवृत्ती वयाची क्रांतीकारक सुधारणा केल्याचे म्हटले गेले.

त्यामुळे मोदी ७५ वर्षांचे झाल्यानंतर काय करतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. गेल्या तीन-चार वर्षांपासून याची खूप चर्चा होती. पण या सगळ्या चर्चांना सिंह यांच्या विधानाने पूर्णविराम मिळेल, असे म्हटले जात आहे.

भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही अलीकडेच निवृत्ती वयाबद्दल विधान केले होते. सरसंघचालकांच्या या विधानाची पंतप्रधान मोदींसोबत जोडून चर्चा सुरू झाली. नंतर भागवतांनी आपले हे विधान मोदींबद्दल नसल्याचे स्पष्ट केले.


हे देखील वाचा –

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू; कोडपासून ते कनेक्टिव्हिटी

एच-१ बी व्हिसा फी वार्षिक नाही ! ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टीकरण

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या