Home / News / MP Barne’s Son Nomination with Luxury Car : खासदार श्रीरंग बारणेंच्या मुलाचा लक्झरी कारमधून अर्ज दाखल

MP Barne’s Son Nomination with Luxury Car : खासदार श्रीरंग बारणेंच्या मुलाचा लक्झरी कारमधून अर्ज दाखल

MP Barne’s Son Nomination with Luxury Car – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर जवळ येत...

By: Team Navakal
MP Barne’s Son Nomination with Luxury Car
Social + WhatsApp CTA

MP Barne’s Son Nomination with Luxury Car – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजीत बारणे यांनी लेक्सस या लक्झरी कारमधून येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक २४ मधील मागास प्रवर्ग (ओबीसी) राखीव जागेसाठी विश्वजीत बारणे यांनी दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी ते लेक्सस एलएक्स ही लक्झरी एसयूव्ही कार घेऊन गेले होते. भारतात या कारची किंमत सुमारे २.८० कोटी रूपये असल्याने मनपा निवडणुकीत श्रीमंतीची झलक पाहायला मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिंदे गट यांच्यात जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. भाजपाकडून शिंदे गटाला ९ जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट १६ जागांवर ठाम आहे . या ओढाताणीमुळे महायुतीची अधिकृत घोषणा लांबणीवर पडली आहे. तरी बारणे यांच्या पुत्राने मात्र अर्ज भरून टाकला आहे .


हे देखील वाचा –

 India Extradition Fugitives : विजय मल्ल्या-ललित मोदीचे ‘पार्टी’ करत भारताला आव्हान; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नीता अंबानी यांच्या हस्ते पार पडले रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये जीवन’ कर्करोग व डायलिसिस केंद्राचे उद्घाटन

 काँग्रेसची महापालिका निवडणुकांसाठी सोलापुर शहरासाठी ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Web Title:
संबंधित बातम्या