Mumbai Cleanliness Rewards ₹4.2 Cr – मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी आता नागरिकांना आणि संस्थांना बक्षीस दिले जाणार आहे.कारण मुंबई महापालिकेने ‘स्वच्छता मंथन’ नावाची स्पर्धा सुरू केली आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून प्रशासकीय वॉर्ड, बाजारपेठा,गृहनिर्माण संस्था,शाळा आदी स्वच्छ ठेवणाऱ्यांना एकूण ४.२० कोटी रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच,या स्वच्छतेत योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांचे मानधन वाढवण्याचाही प्रस्ताव आहे.
‘स्वच्छता मंथन’ स्पर्धेतील बक्षिसे पुढीलप्रमाणे- स्वच्छ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) गट: प्रथम – ५० लाख रुपये द्वितीय – २५ लाख रुपये तृतीय – १५ लाख रुपये स्वच्छ बाजारपेठ परिसर गट: प्रथम – १५ लाख रुपये, द्वितीय – १० लाख रुपये,तृतीय – ५ लाख रुपये अशी आहेत.
त्याचप्रमाणे सेलिब्रिटी, नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांना परिसर दत्तक घेऊन स्वच्छता राखण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेवकांसाठी स्वच्छ मुंबई स्वच्छत अभियानातील स्वयंसेवकांचे मानधन वाढवण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.
तसेच इतर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार नगरसेवकांसाठी स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत, स्वच्छ विभाग ठेवणाऱ्या नगरसेवकांना एक कोटी रुपयांपर्यंतचा विशेष निधी दिला जाणार होता.नवी मुंबईसारख्या शहरांनी स्वच्छतेच्या राष्ट्रीय सर्वेक्षणात मानांकन मिळवले आहे, तिथे विविध स्तरांवर पुरस्कार दिले जातात. मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी विविध स्तरांवर बक्षिसे आणि प्रोत्साहने दिली जात आहेत.
हे देखील वाचा –
कोकणात १५ वर्षांत एकही धरण नाही! नीलेश राणेंचा आरोप
मनरेगाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव; महात्मा गांधी ऐवजी पूज्य बापू
NGT Halts Tapovan Cutting Till Jan 15 : तपोवन वृक्षतोडीला हरित लवादाची १५ जानेवारीपर्यंत स्थगिती









