Home / News / Mumbai Water : मुंबईची पाणीचिंता मिटली;११ महिन्याचा पाणीसाठा

Mumbai Water : मुंबईची पाणीचिंता मिटली;११ महिन्याचा पाणीसाठा

Mumbai Water : यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव सप्टेंबर महिना संपत आला तरी काठोकाठ भरलेले आहेत.सर्व तलावांत १४ लाख...

By: Team Navakal
Mumbai Water

Mumbai Water : यंदा मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव सप्टेंबर महिना संपत आला तरी काठोकाठ भरलेले आहेत.सर्व तलावांत १४ लाख ४० हजार २२० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे.हे पाणी ऑगस्ट २०२६ पर्यंत म्हणजेच पुढील ११ महिने पुरणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची (Mumbaikars)पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबई शहराला दररोज सरासरी ३,९५० दशलक्ष लिटर (litres of water) म्हणजे महिन्याला १ लाख २० हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्याशिवाय काही ठाणे (Thane) व भिवंडी शहराला ही पाणीपुरवठा केला जातो.त्यामुळे सध्याचा पाणीपुरवठा हा कोणतीही कपात न करता किमान ११ महिने पुरेल इतका आहे.

त्यामुळे मुंबईकरांना ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत पाणीटंचाईची भीती नसल्याचे एका वरिष्ठ अभियंत्याने(Senior engineer) सांगितले. मुंबई शहराला ठाणे जिल्ह्यातील तानसा (Tansa), मोडक सागर, मध्य वैतरणा व भातसा, नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा (Upper Vaitarna,)व नॅशनल पार्कमधील तुळशी व विहार तलावांतून (Vihar lakes) पाणीपुरवठा होत असतो.या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सप्टेंबर अखेरपर्यंत १४ लाख दशलक्ष लीटरपेक्षा जास्त पाणी शिल्लक राहिल्यास ऑगस्टपर्यंत पाण्याची कमतरता भासत नाही.


हे देखील वाचा –

नवरात्रीचे राजकीय नवरंग ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमाचे राजकारण

आयोगाच्या आधार लिंक सुविधेवर राहुल गांधींची टीकात्मक पोस्ट

मराठवाड्याचे शेतकरी उद्ध्वस्त झाले ! पीक गेले! माती गेली! पुन्हा पावसाचा इशारा

Web Title:
संबंधित बातम्या