Garba Pods – देशभरात सध्या नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. मुंबईतील नवरात्रोत्सव (Navratri Mumbai’s Garba )नेहमीच खास असतो.या उत्सवातील गरबा नृत्य हे प्रमुख आकर्षण.मुंबईत यंदा या गरबा नृत्यामध्ये एक अनोखा ट्रेण्ड आला आहे.वांद्रे येथील वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) प्रसिध्द गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) हिचा लाईव्ह शो तुम्हाला फक्त आपली मित्रमंडळी किंवा कुटुंबियांसोबत दांडिया खेळत पाहता येणार आहे.त्यासाठी अनोखी गरबा पॉड ही संकल्पना साकारण्यात आली आहे.
हे गरबा पॉड म्हणजे फक्त १२ जणांना गरबा खेळण्यासाठी तयार केलेले छोटे मंडप आहेत.म्हणजे हा १२ जणांचा (12 people)गट तुम्हालाच तयार करायचा आहे. त्यामुळे प्रचंड गर्दीत अनोळखी व्यक्तिंसोबत नृत्य करण्याऐवजी तुम्हाला तुमचे आवडते मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबियांसोबत गरबा खेळत फाल्गुनीच्या धमाकेदार गाण्यांचा आनंद लुटता येणार आहे.
मात्र हा अनोखा अनुभव घेण्यासाठी गरबा पॉड भाड्याने घ्यावे लागतील.हे गरबा पॉड तीन भागांत (झोन)विभागण्यात आले आहेत.त्याचे भाडे एका रात्रीसाठी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत आहेत.झोन -ए साठी १ लाख (1,00,000 a night), झोन-बी साठी सव्वा लाख तर झोन-सी साठी दीड लाख रुपये असे भाडे आहे. गरबा पॉड भाड्याने घेणाऱ्या गटांना प्रत्येकी एलईडी दांडियांचे (LED dandiya sticks) बारा संच, १० हजार रुपयांचे खाण्या-पिण्याचे कुपन आणि वॉलेट पार्किंग अशा सुविधा दिल्या आहेत.
सध्या मुंबईत या गरबा पॉडची जोरदार चर्चा आहे. काही लोकांना ही नवीन संकल्पना भलतीच पसंत पडली आहे. तर काहींचा याला विरोध आहे.अशा प्रकारे गटा-गटांमध्ये विभागणी केल्याने खुल्या मैदानात सर्वांसोबत एका ठेक्यावर गरबा खेळण्याचा आणि सर्वांमध्ये बंधुभाव वृध्दिंगत करण्याचा मूळ हेतुच मारला जातो,असे विरोध करणाऱ्यांचे मत आहे.तर गरबाच्या नावाखाली महिलांशी अंगचटीला येऊ पाहणाऱ्यांपासून दूर आपल्या लोकांसोबत गरबा खेळता येत असल्याने ही अत्यंत आवश्यक संकल्पना आहे,असे गरबा पॉडला पसंती देणाऱ्यांचे म्हणणे आहे
हे देखील वाचा –
आयोगाच्या आधार लिंक सुविधेवर राहुल गांधींची टीकात्मक पोस्ट
मुंबईची पाणीचिंता मिटली;११ महिन्याचा पाणीसाठा
मराठवाड्याचे शेतकरी उद्ध्वस्त झाले ! पीक गेले! माती गेली! पुन्हा पावसाचा इशारा