Home / News / Munde Saved by Bhayyaji, Gutte Claims : धनंजय मुंडे यांचा तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता भय्यूजी महाराजांनी वाचवले ! रत्नाकर गुट्टे यांचा दावा

Munde Saved by Bhayyaji, Gutte Claims : धनंजय मुंडे यांचा तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता भय्यूजी महाराजांनी वाचवले ! रत्नाकर गुट्टे यांचा दावा

Munde Saved by Bhayyaji, Gutte Claims – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत एका धक्कदायक दावा गंगाखेडचे...

By: Team Navakal
Munde Saved by Bhayyaji, Gutte Claims
Social + WhatsApp CTA


Munde Saved by Bhayyaji, Gutte Claims – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत एका धक्कदायक दावा गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नुकताच जाहीर सभेत केला. आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले की धनूभाऊ तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता, पण दिवंगत भय्यूजी महाराज यांनी त्यावेळी तुम्हाला वाचवलं होते.

मतदानाच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना गुट्टे यांनी काळ प्रचार सभेत बोलताना म्हटले की, धनंजय मुंडे हे माझ्यावर सातत्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा आरोप करतात. या आरोपात कसलेही तथ्य नाही.

तुम्ही मला नीरव मोदी म्हणत असाल तर धनुभाऊ तुम्ही विजय मल्ल्या आहात. विजय मल्ल्याने देशाला फसवले आणि तो कशाचा शौकीन होता हे सगळ्यांना माहित आहे. गंगाखेड आणि परळीची तुलना होऊ शकत नाही. गंगाखेड संत जनाबाईचे जन्मस्थळ आहे.

परळीला सुद्धा वैद्यनाथाचे मंदिर आहे पण परळी आणि बीड केवळ राज्यातच नाही तर देशात बदनाम झाले आहे. बीड, परळीला बदनाम कोणी केले ? धनुभाऊ ही तुमची आणि तुमच्या जवळच्या कार्यकर्त्याची मेहरबानी आहे. ‘मर्डर’ तर तुमच्या हातचा मळ आहे. तुम्ही चुटकीसरशी ‘मर्डर’ करता.

परळीमध्ये जेवढे मर्डर झाले त्यामागे धनुभाऊचीच माणसे होती. मर्डर झालेली माणसे धनुभाऊची आणि करणारीही धनुभाऊचीच. धनंजय मुंडे हे गुंडांचे पाठीराखे असून, त्यांचेच हात रक्ताने बरबटलेले आहेत. त्यांचा मध्य प्रदेशात खून झाला असता, पण त्यांना भैय्यू महाराजांनी वाचवले, असा आरोप गुट्टे यांनी मुंडेंवर केला आहे.

गंगाखेड नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनी धुराळा उडाला आहे. गंगाखेड पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे राष्ट्रवादी (अजीत पवार) पक्षाकडून रिंगणात आहेत.

गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची स्थानिक आघाडी निवडणूक लढवत आहे. गंगाखेडमध्ये गुट्टे विरुद्ध केंद्रे, अशी लढत असून, माजी आमदार मधुसुदन केंद्रे यांच्या पत्नी ऊर्मिलाताई या धनंजय मुंडे यांच्या भगिनी आहेत.

दरम्यान,या याबाबत पंकजा मुंडे पुढे यांना प्रतिक्रिया विचारली आता पत्रकारांशी बोलतांना त्या म्हणाल्या की , आम्हाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात येण्यापूर्वी असल्या बिभत्स आरोपांपासून दूरच ठेवले आहे. असल्या कोणत्याही चर्चा कधी कानावर येऊ दिल्या नाहीत.


हे देखील वाचा –

मतदार यादीतील गोंधळ संपेना आदित्य ठाकरेंची आयोगावर टीका

 संसदेचे कामकाज सलग दुसऱ्या दिवशी तहकूब

Virat Kohli Vs Gautam Gambhir : विराट – गंभीरमध्ये पुन्हा वादाची ठिणगी?

Web Title:
संबंधित बातम्या