Municipal Poll Nominations Close – राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपली. या निवडणुकीत राज्यभर उलट-सुलट आघाड्या झाल्याचे दिसून आले.
सर्व पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवल्याने आता २१ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.
एकूण २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या या निवडणुकीच्या मैदानात असल्या तरी अनेक ठिकाणी या आघाडीतील घटक पक्षच एकमेकाविरोधात उभे ठाकले आहेत. काही ठिकाणी उबाठा आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आली आहे. तर काही ठिकाणी अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे.
एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी सगळ्याच पक्षांनी युतीधर्माला हरताळ फासला आहे. काही ठिकाणी त्याला मैत्रिपूर्ण लढती असे नाव दिले आहे. त्यामुे मतदारच चक्रावून गेले आहेत.
हे देखील वाचा –
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा
Thackeray Brothers : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी तब्ब्ल ११ वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र..









