Home / News / अंतराळातून भारत कसा दिसतो ? सुनिता विल्यम्स म्हणाल्या…

अंतराळातून भारत कसा दिसतो ? सुनिता विल्यम्स म्हणाल्या…

Sunita Williams on India | भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स (Sunita Williams) या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) त्यांच्या प्रदीर्घ मिशननंतर...

By: Team Navakal

Sunita Williams on India | भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स (Sunita Williams) या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) त्यांच्या प्रदीर्घ मिशननंतर काही दिवसांपूर्वीच पृथ्वी परतल्या आहेत. त्यानंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्या अंतराळातील अनुभवांची माहिती दिली. 

286 दिवस अंतराळात घालवल्यानंतर, जेव्हा त्यांना विचारण्यात आले की पृथ्वीवरून भारत कसा दिसतो?तेव्हा त्यांनी “अविश्वसनीय, अगदी अद्भुत.”, असे उत्तर दिले.

विलियम्स (NASA astronaut Sunita Williams) यांना विशेषतः हिमालयाच्या आकर्षक दृश्यांनी प्रभावित केले. त्या म्हणाल्या की, जेव्हा ISS हिमालयाने बाजूस जात असे, तेव्हा त्यांचे सहकारी बुच विल्मोर त्याचे छान फोटो काढायचे. “प्रत्येक वेळी आम्ही हिमालयावरून गेलो, बुचला त्या दृश्यांचे छायाचित्र मिळाले, ते खूप सुंदर होते,” असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विलियम्स यांनी रात्रीच्या वेळी भारतातील दिव्यांनी झगमगलेली शहरे आणि लहान गावे पाहण्याचा अनुभव देखील विशेष ठरल्याचे सांगितले.त्या म्हणाल्या की, हे दृश्य खरंच “अविश्वसनीय” होते.  लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे संपूर्ण भारतभर दिसणारे प्रकाशाचे जाळे. दिव्यांनी झगमगलेली शहरे आणि लहान गावे. हिमालय सर्वाधिक उठून दिसतो.

59 वर्षीय विलियम्स यांनी नासाच्या आगामी एक्सिओम मिशनबद्दल उत्साह व्यक्त केला, ज्यात भारतीय हवाई दलाचे चाचणी पायलट आणि इस्रोचे अंतराळवीर सुभांशु शुक्ला यांचा समावेश आहे.

भारताच्या अंतराळ कार्यक्रमात योगदान देण्याची इच्छा व्यक्त करत, विलियम्स यांनी सांगितले की त्या आपल्या अनुभवांसह देशाच्या वाढत्या अंतराळ महत्त्वाकांक्षांना सहाय्य करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांचा विश्वास आहे की, “मला या कार्यक्रमाचा भाग व्हायला आणि भारताला मदत करण्यास आवडेल.” तसेच, सुनीता विलियम्स यांनी लवकरच भारत भेटीची इच्छा व्यक्त केली. 

Web Title:
संबंधित बातम्या