Nine Cases Filed Against Maratha Protesters in Mumbai After Movement Ends
Cases Filed After Maratha Protest –मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation)पाच दिवस मुंबईत आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आंदोलन संपल्यानंतर काही तासांतच मुंबई पोलिसांनी एकूण ९ गुन्हे दाखल केले. (Mumbai police registered cases)अज्ञात व्यक्तींविरोधात ही कारवाई केली आहे.
मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आझाद मैदानात आंदोलन केले. सरकारकडून काही मागण्या मान्य झाल्यानंतर काल सायंकाळी आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले आणि गावांकडे परतले. मात्र त्याच रात्रीपासून आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, जे जे मार्ग, कुलाबा, एम. आर. ए. मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवले गेले. या गुन्ह्यांमध्ये बेकायदेशीर जमाव जमवणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, घोषणाबाजी, धमकावणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन यांचा समावेश आहे.
८ ते १० आंदोलकांविरोधात ही गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. सीएसएमटी परिसर(CSMT), मंत्रालय, उच्च न्यायालय, बीएसई, मरिन ड्राईव्ह या भागात आंदोलक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
राज्यात पुढील ३ दिवस पावसाचे!अनंत चतुर्दशीलाही हजेरी लावणार
Honda Activa 6G की TVS Jupiter 110? तुमच्यासाठी कोणती स्कूटर आहे सर्वोत्तम? जाणून घ्या
दोन्ही मतदारसंघात नाव काँग्रेस प्रवक्त्याला नोटीस ! पवन खेरा अडचणीत