Home / News / प.बंगालमध्ये परिचारिकेचा मृत्यू!भाजपा व कम्युनिस्टांचे आंदोलन

प.बंगालमध्ये परिचारिकेचा मृत्यू!भाजपा व कम्युनिस्टांचे आंदोलन

Nurse's Death in West Bengal Sparks BJP & Communist Protests

Nurse’s Death in West Bengal Sparks BJP & Communist Protests

कोलकाता – पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयातील परिचारिकेने(West Bengal nurse death) आत्महत्या केल्यानंतर तिला न्याय मिळावा यासाठी भाजपा व कम्युनिस्ट पार्टीच्या (BJP & Communist protest in West Bengal)कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रुग्णालयातील गैरव्यवहारांची माहिती मिळाल्याने तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. तर प्रियकराने लग्नाला नकार दिल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.(Hospital negligence India)
हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथील एका खाजगी रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर एका २४ वर्षीय परिचारिकेचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर तिच्या वडीलांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या मुलीची ऑटोप्सीचे चित्रीकरण करण्याची मागणी केली. रुग्णालयाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. प्रियकराने लग्नाला नकार दिल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या तरुणीचे शवविच्छेदन होणार असलेल्या रुग्णालयाबाहेर कम्युनिस्ट पक्षाने तीव्र आंदोलन केले. या रुग्णालयात योग्य त्या सुविधा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्याठिकाणी तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता, त्याठिकाणचा दरवाजा तुटल्याचे आढळल्याचे सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालचे राज्यमंत्री व स्थानिक आमदार बेचाराम मन्ना यांनी तातडीने कारवाई करत या मुलीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी कोलकात्याच्या रुग्णालयात करण्याचे व त्याचे व्हिडिओ शूटिंग करण्याचे आदेश दिले.