Only 179 potholes in Mumbai – a bizarre claim by the municipal corporation
मुंबई – मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊन खड्ड्यांमुळे त्याची चाळणी(Mumbai potholes) झाली आहे. परंतु शहरात केवळ १७९ खड्डे असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.(Municipal corporation potholes claim)
महापालिकेच्या रस्ते विभागाचे मुख्य अभियंता गिरीश निकम यांनी सांगितले की,काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे मागील दीड महिन्यात महापालिकेकडे खड्डयांच्या १,१३७ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ९५८ खड्डे पालिकेच्या पथकाने बुजवले. या तक्रारींपैकी केवळ १७९ खड्डे शिल्लक आहेत. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर हे खड्डे बुजवले जाणार आहेत.
मुंबईत १,२०० किमीहून अधिक रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. त्यामुळे यावर्षी मागील काही वर्षांच्या तुलनेत खड्यांच्या तक्रारी कमी आहेत. प्रभाग स्तरावर पथके तैनात करून तातडीने खड्डे भरले आहेत.(Potholes in Mumbai 2025)
याशिवाय मुंबई महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी हॉट मिक्स, कोल्ड मिक्स, जिओ पॉलिमर अशा विविध पर्यायांची चाचपणी केली होती. यावर्षी मागील वर्षीप्रमाणेच मास्टिक अस्फाल्ट म्हणजेच डांबरानेच खड्डे बुजवले जात आहेत. पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी खर्चाची तरतूद केली आहे. त्यानुसार सात परिमंडळातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी ७९ कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
आतापर्यंत शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत.शिल्लक कामे पावसाळ्यानंतर वेगात पूर्ण होतील. कामे शिल्लक असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते. त्यामुळे पावसाळ्यात मुंबई पालिकेला सुमारे दीडशे किमी लांबीच्या रस्त्यावरील खड्डेच बुजवावे लागणार आहेत. त्यामुळे अंदाजे खर्चात ५१ टक्के कपात आहे. गेल्या वर्षी खड्डयांसाठी १५५ कोटी रुपयांची तरतूद होती.