Operation Sindoor – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Terrorist attack) प्रत्युत्तर देत भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले. यामध्ये भारताने पाकिस्तानच्या (Pakistan) अनेक प्रमुख दहशतवादी लष्करी तळांवर हल्ले केले. हे ऑपरेशन राबवताना भारताने यशस्वीपणे पाकची पाच-सहा विमाने (six Pakistani aircraft)पाडली असल्याचे भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग (Air Chief Marshal Amar Preet Singh)यांनी सांगितले. याचे आपल्याकडे याचे पुरावे असल्याचेदेखील ते म्हणाले.
९३ व्या हवाई दलाच्या दिनानिमित्त आयोजित समारंभात बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. भारताची विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा हास्यास्पद असून त्या त्यांच्या ‘मनोहर कहानियाँ’ असल्याचा टोलाही ए. पी. सिंग यांनी लगावला आहे.
ते म्हणाले की, पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्याची पाकिस्तानला खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. पाकिस्तानी दहशतवादी तळांचा अचूक वेध घेत हे ऑपरेशन यशस्वी करण्यात आले. हे युद्ध आम्ही तीन ते चार दिवसांतच संपवले आणि जगाने यावरून भारताची प्रेरणा घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.३०० किमी अंतरापर्यंत हा हल्ला करण्यात आला. १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे कारवाई करण्यात आली. भारतीय हवाई दलाने तिन्ही दलांना योग्य समन्वय साधून ती पार पाडली. तसे आदेशच होते.
पाकला भूगोलातून नाहीसे करू!
लष्करप्रमुख द्विवेदी यांचा इशारा
भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी (Army Chief General Upendra Dwivedi)यांनी राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यातील लष्करी छावणीला आज भेट दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा देत म्हटले की, भारताने ऑपरेशन सिंदूरवेळी संयम बाळगला. पण आता तो बाळगणार नाही. भूगोलात स्वतःचे स्थान ठेवायचे आहे की नाही, याचा पाकिस्तानने स्वतःच विचार करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद न केल्यास पाकिस्तानला भूगोलातून नाहीसे करू. आता तुम्ही तुमची तयारी करून ठेवा. देवाला वाटले, तर आपल्याला लवकरच ही संधी मिळेल.
हे देखील वाचा –
पूरग्रस्तांसाठी जेजुरी देवस्थानने १ कोटी ११ लाखांची मदत दिली