PM Modi विरोधकांनी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला सिंदूर चर्चेवरून मोदींचा टोला

Opposition has shot themselves in the foot, says Modi in jibe over sindoor row

Opposition has shot themselves in the foot, says Modi in jibe over sindoor row


नवी दिल्ली – संसद भवनाच्या सभागृहात आज भाजपाच्या नेतृत्वाखालील(NDA Meeting)एनडीएच्या झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi sindoor operation)यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा करण्याची मागणी करून विरोधकांनी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला,असा टोला मोदी यांनी लगावला.(BJP NDA)
पंतप्रधान मोदी यांचे सभागृहात आगमन होताच एनडीएच्या खासदारांनी हर हर महादेव आणि भारत माता की जय चे नारे देत सभागृह दणाणून सोडले.याप्रसंगी ऑपरेशन सिंदूरचे सारे श्रेय भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदी यांना देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या सफलतेचा ठराव मंजूर करण्यात आला.(Rajnath Singh honours Modi)
या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चेची मागणी करून मोठी चूक केली. हा असा विरोधी पक्ष आहे की ज्याने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला. कारण हे माझे क्षेत्र आहे आणि साक्षात परमेश्वर माझ्या पाठीशी आहे.