Panchayat Samiti, Z.P Election – नववर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदांबरोबरच १२५ पंचायत समित्यांची निवडणूक २१ दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तर ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागू होऊ शकते अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील ३२ जिल्हा परिषदांपैकी २० जिल्हा परिषदा आणि ३३६ पैकी २११ पंचायत समित्यांनी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. त्यामुळे आरक्षण मर्यादेचे पालन केलेल्या १२ जिल्हा परिषदांचीच निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे.
त्यामध्ये सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका ३१ जानेवारीनंतर होतील.
दरम्यान, जानेवारी–फेब्रुवारीत मुदत संपणाऱ्या पाच हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. आरक्षणामुळे स्थगित २० जिल्हा परिषद व २११ पंचायत समित्यांबाबत २१ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने त्यानंतर पुढील निर्णय होईल.
हे देखील वाचा –
पुण्यात राजकारणाचा ब्लॉकबस्टर ड्रामा; आघाडी तुटली, दादांचा प्रस्ताव फेटाळला?
राऊत परिवाराची राजकीय ताकद पुन्हा मैदानावर; संदीप राऊतांच्या महापालिका प्रवेशामुळे घराणेशाही चर्चेत









