Home / News / Pataal Lok S2 Series: ‘पाताल लोक 2’ चा दमदार ट्रेलर आला समोर, ‘या’ तारखेला रिलीज होणार सीरिज

Pataal Lok S2 Series: ‘पाताल लोक 2’ चा दमदार ट्रेलर आला समोर, ‘या’ तारखेला रिलीज होणार सीरिज

Pataal Lok S2 Series : ‘पाताल लोक’ वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादानंतर आता सीरिजचा दुसरा सीझन (Pataal Lok S2) लवकरच भेटीला येणार...

By: E-Paper Navakal

Pataal Lok S2 Series : ‘पाताल लोक’ वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादानंतर आता सीरिजचा दुसरा सीझन (Pataal Lok S2) लवकरच भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा टीझर समोर आला होता. त्यानंतर आता एक दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

जयदीप अहलावतची (Jaideep Ahlawat) मोस्ट अवेटेड वेब सीरिज ‘पाताल लोक 2’ (Pataal Lok S2) 17 जानेवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन अविनाश अरुण धावरे यांनी केले आहे. जयदीपसोबतच दुसऱ्या सीझनमध्ये इश्वाक सिंग आणि गुल पनाग पुन्हा पाहायला मिळतील. यासोबतच, तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर आणि जाह्नू बरुआ या नवीन कलाकारांचीही भूमिका या सीरिजमध्ये आहे.

‘पाताल लोक 2’ (Pataal Lok S2 Trailer) चा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. यामध्ये पोलिस अधिकारी हाथीराम चौधरी ही भूमिका साकारणारे जयदीप अहलावत हे खुनाच्या प्रकरणाचा तपास करताना थेट नागालँडमध्ये पोहोचतात असे दाखवले आहे. या ट्रेलरमध्ये नागालँडमधील गुन्हेगारीसोबतच हाथीराम चौधरी आणि साथीदार इम्रान अन्सारी यांचा प्रवास देखील दाखवला आहे.

या सीरिजचा पहिला सीझन 2020 मध्ये आला होता. आता दुसरा सीझन (Pataal Lok S2) प्रेक्षकांना 17 जानेवारीला Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. या सीरिजचे लेखन, निर्मिती आणि कार्यकारी निर्माते सुदीप शर्मा यांनी केले आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या