Home / News / PM in Manipur : पंतप्रधान उद्या पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर ! हिंसा सुरूच

PM in Manipur : पंतप्रधान उद्या पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर ! हिंसा सुरूच

PM Modi’s First Visit to Manipur Since Ethnic Clashes; Tensions Rise Anew PM Modi Visits Violence-Hit Manipur – पंतप्रधान नरेंद्र...

By: Team Navakal
PM Modi Visits Violence-Hit Manipur

PM Modi’s First Visit to Manipur Since Ethnic Clashes; Tensions Rise Anew

PM Modi Visits Violence-Hit Manipur – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)उद्या मणीपूरच्या (Manipur visit ) दौऱ्यावर येत आहेत . मणिपूरमध्ये सतत दोन समाजात हिंसाचार सुरू आहे. मात्र पंतप्रधान पहिल्यांदाच दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उद्याच्या दौऱ्याआधीही मणिपूरमध्ये नव्याने हिंसाचाराचा भडका उडाला आहे.(Rising Violence Ahead of the Visit)
काल रात्री चुराचांदपूर इथे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले पोस्टर फाडले. सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड पाडून जाळपोळ केली. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमक उडाली.

चुराचांदपूर पोलिस स्टेशनपासून ५ किलोमीटर अंतरावरील पीसोनमुन गावात हिंसाचाराची ही घटना घडली. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर हे आंदोलक पसार झाले. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मणिपूर पोलिसांसोबतच केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांवर सुरक्षेची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. या दौऱ्यात ८,५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत.(Development Projects on the Agenda)

चुराचांदपूर येथील मैदानावर ७,३०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन होईल. हा कुकीबहुल भाग आहे. त्यानंतर ते मैतेईबहुल इंफाळ येथे १,२०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. कुकी आणि मैतेई हे मणिपूरमधील दोन प्रमुख समुदाय आहेत. या दोन समुदायात अनुसुचित जमाती आरक्षणावरून वाद सुरू आहे.

मैतेई समुदायाला अनुसुचित जमातीचा दर्जा देण्याची शिफारस मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. अनुसुचित जमाती प्रवर्गात असलेल्या कुकी समुदायाने याला तीव्र विरोध केला. न्यायालयाच्या निकालानंतर ३ मे २०२३ रोजी सुरू झालेल्या हिंसाचारात जवळपास ३०० जणांचा जीव गेला. शेकडो जण जखमी झाले. हजारो लोक विस्थापित झाले. या हिंसाचारमुळे केंद्रासोबतच राज्यात सत्ता असलेल्या भाजप नेतृत्वाला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. प्रचंड दबावानंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.


हे देखील वाचा – 

 खा.निकम सरकारी वकील कसे ? गँगस्टर विजय पालांडेचा आक्षेप

लोढा डेव्हलपर्ससोबत महाराष्ट्र सरकारचा सामंजस्य करा; राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठा ‘ग्रीन डेटा सेंटर पार्क’

सरकारी नोकरीच्या संधीच संधी, अनेक विभागांमध्ये मोठी भरती; त्वरित करा अर्ज

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या