Prashant Kishor’s assurance of ₹2,000 pension for senior citizens.
हसनपूर – आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन सूराज पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर(Prashant Kishor pension scheme) यांची बिहार बदलाव यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त समस्तीपूरच्या हसनपूर विधानसभा मतदारसंघातील बिठान येथील गांधी मैदानात त्यांनी जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी बिहारमधील ज्येष्ठ नागरिकांना २ हजार रुपयांची पेन्शन देणार असल्याचे आश्वासन दिले.(Senior citizen pension)
प्रशांत किशोर म्हणाले की, लालूजींचा मुलगा नववी पासही नाही, मात्र त्याला सत्ता हवी आहे, तर बिहारमधील सुशिक्षित मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. जर जनसुराज व्यवस्थेचे सरकार स्थापन झाले तर(2000 pension scheme India)बिहारमधील तरुणांना कामासाठी बाहेरील राज्यांमध्ये जावे लागणार नाही आणि त्यांना बिहारमध्येच १०-१२ हजार रुपयांचा रोजगार मिळेल. डिसेंबर २०२५ पासून ६० वर्षांवरील पुरुष आणि महिलांना मासिक २००० रुपये पेन्शन दिले जाईल. याशिवाय, सरकारी शाळांमध्ये सुधारणा होईपर्यंत आणि १५ वर्षांखालील मुलांना खाजगी शाळांमध्ये फी भरण्याची जबाबदारी सरकार घेईल, जेणेकरून गरीब मुलेही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतील.
प्रशांत किशोर यांनी जनतेला आवाहन केले की, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान करा आणि जे नेते जनतेच्या साधनसंपत्तीचा वापर केवळ त्यांच्या स्वार्थासाठी करतात त्यांना निवडून देऊ नका. मुलांच्या शिक्षण आणि रोजगाराला प्राधान्य दिले पाहिजे.