मंदिरात इस्लामचा प्रचार हा गुन्हा ठरत नाही !हायकोर्ट

"Preaching Islam in a Temple is Not a Crime: High Court"

Preaching Islam in a Temple is Not a Crime: High Court

बंगळुरू – मंदिरात इस्लाम धर्माचा प्रचार करणे,अल्लाची स्तुती करणे किंवा इस्लाम धर्माबद्दल बोलणे हा गुन्हा ठरत नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा (Islam Preaching in Temple)कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला.(Karnataka High Court Verdict)
कर्नाटकच्या जामखंडी शहरातील रामतीर्थ मंदिरात इस्लाम धर्माचा प्रचार करणारी पत्रके वाटणाऱ्या तीन मुस्लीम तरुणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तिन्ही आरोपींवरील गुन्हा रद्दबातल केला .(Preaching vs Conversion)
या तीन आरोपींना राज्याच्या धर्मांतरविरोधी कायद्यान्वये अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका करताना स्पष्ट केले की, धर्मांतराचा पुरावा नसल्यास मंदिरात इस्लामचा प्रचार करणारी पत्रके वाटणे हा गुन्हा ठरत नाही.(Ramatirtha Temple Case)
या आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २९९, ३५१(२) आणि ३(५) व कर्नाटक धर्म स्वातंत्र्य हक्क संरक्षण कायदा २०२२ च्य कलम ५ अन्वये आरोप ठेवण्यात आले होते. त्यावर न्या. व्यंकटेश यांनी सांगितले की, आरोपींनी संबंधित कायद्यानुसार कोणताही गुन्हा केलेला नाही.कारण त्यांनी कोणत्याही व्यक्तीला इस्लाम धर्म (Karnataka Muslim Justice Verdict)स्वीकारण्याचा आग्रह केलेला नाही.