Home / News / मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन नवीन धरणांचा प्रस्ताव

मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी दोन नवीन धरणांचा प्रस्ताव

Mumbai Plans Two New Dams

Proposal for Two New Dams to Boost Mumbai’s Water Supply

Mumbai Plans Two New Dams – मुंबईतील (Mumbai)वाढत्या लोकसंख्येला लागणार्‍या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आता दोन नवीन धरणे बांधण्याचा मुंबई महापालिकेचा(BMC) प्रस्ताव आहे.पालघर (Palghar)जिल्ह्यातील पिंजाळ आणि गारगाई नद्यांवर ही दोन धरणे बांधण्याची योजना आहे.

पुढील १६ वर्षापर्यंत म्हणजे २०४१ पर्यंत मुंबईकरांना दररोज ६५३५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच पालिकेने आता नवीन दोन धरणांचा प्रस्ताव तयार केला आहे. २०१४ मध्ये बांधलेल्या मध्य वैतरणा धरणानंतर पालिका बांधत असलेली ही पहिलीच दोन धरणे असतील.पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील खिडसे परिसरात पिंजाळ नदीवर एक धरण बांधले जाणार आहे. तर दुसरे धरण पालघर जिल्ह्यातीलच वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर असणार आहे. गारगाईचे पाणी तेथून भूमिगत बोगद्याद्वारे मोडकसागर तलावात आणले जाईल.

सध्या मुंबई महापालिका रोज ४ हजार एमएलडी पाणी मुंबईकरांना पुरवत असून त्यामधे साधारण ५०० एमएलडी पाण्याची टंचाई भासत असते. भविष्यात ही तूट ५० टक्क्यांनी वाढेल,असा अंदाज आहे.त्यामुळे त्यावर उपाय म्हणून या दोन नवीन धरणांचा प्रस्ताव आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

अवैध वृक्षतोडीमुळे हिमालयात पूर आणि भुस्खलन! सुप्रीम कोर्टाची राज्यांना नोटीस

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ योजनेंतर्गत आता लाभार्थ्यांना देणार 2500 रुपये

Arun Gawli अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी अखेर तुरूंगाबाहेर! १८ वर्षांनी जामीन