Pune,Pimpri, both NCP Together – भाजपाने युतीची शक्यता फेटाळल्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनी एकत्रितरित्या पुणे व पिंपरीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मतविभाजन टाळण्यासाठी दोन्ही बाजूनी युतीसाठी अनुकुलता दर्शविण्यात आली असून स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
पिंपरीमधील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे सदस्य या दोघांची नुकतीच बैठक झाली.
नाना काटे यांना सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता व त्यांनीही या निवडणुका एकत्र लढाव्यात अशी इच्छा व्यक्त केली शिवाय आपण याबाबत अजितदादा यांनाही बोलणार असल्याचेही सांगितले.
मात्र ही निवडणूक आपल्याच चिन्हावर लढण्याचा आग्रह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केला असून तशी अटच अजित पवार यांच्या पक्षासमोर ठेवली आहे. लवकरच दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते भेटणार असून त्यावेळी यावर निर्णय घेतला जाणार आहे.
हे देखील वाचा –
मुंबईसाठी आदित्य ठाकरेंचा महा एल्गार; निवडणुकांच्या घोषणानंतर आदित्य ठाकरेंची मुंबईत पहिली सभा..









