RaGa Meets Hariom Family – उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये जमावाने चोर समजून केलेल्या बेदम मारहाणीत मरण पावलेला दलित तरूण हरिओम वाल्मिकी याच्या कुटुंबियांची आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली.
राहुल गांधी यांच्या भेटीच्या आधी मोठे नाट्य घडले. वाल्मिकी यांच्या घरासमोर पोलिसांनी काही वेळ राहुल गांधी यांना रोखून धरले होते. राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा नाही असे वाल्मिक कुटुंब सांगत असल्याचा एक व्हिडिओदेखील तेव्हा व्हायरल झाला होता. प्रत्यक्षात मात्र कुटुंबाला भेट हवी होती. राहुल गांधी भेट घेण्यासाठी अडून राहिल्यावर पोलिसांनी नाईलाजाने त्यांना भेटू दिले .
रायबरेलीमध्ये अशी अफवा उठली होती की चोरांची एक टोळी ड्रोनच्या सहाय्याने घराची रेकी करत आहे. त्यामुळे काही तरुण गटागटाने रात्रीच्या वेळी गस्त घालत होते.
२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तरुणांच्या एका गटाने हरिओम वाल्मिकी याला चोर समजून बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे दलितांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज रायबरेली मतदारसंघातील फतेहपूर येथील हरिओम वाल्मिकीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र वाल्मिकी कुटुंबाच्या घरासमोर राहुल गांधी पोहोचले असता पोलिसांनी त्यांना रोखले.
वाल्मिकी कुटुंब आपणास भेटू इच्छित नाही असा व्हिडिओ दाखवत पोलिसांनी राहुल गांधी यांना माघारी जाण्यास सांगितले. मात्र राहुल गांधी वाल्मिकींच्या घरासमोर आपल्या गाडीत बसून राहिले. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याचे पाहताच पोलिसांनी राहुल गांधी यांना वाल्मिकी कुटुंबियांची भेट घेण्यास परवानगी दिली.
वाल्मिकी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, आज सकाळी सरकारने वाल्मिक कुटुंबियांना धमकावून मला भेटू नका,असे सांगितले.सरकारच्या दबावाखाली वाल्मिकी कुटुंबियांनी व्हिडिओ चित्रित केला. दलितांवरील अत्याचाराचे हे आणखी एक गंभीर प्रकरण आहे. सरकारने आम्हाला धमकावले की राहुल गांधींना भेटू नका असे त्या कुटुंबाने राहुल गांधींना सांगितले. काँग्रेस वाल्मिकी कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करील.
हे देखील वाचा –
यंदा शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी साजरी करणार ! शरद पवारांची माहिती
कोयना धरणग्रस्तांची परवड ६५ वर्षानंतरही पूर्ण हक्क नाही
Gopichand Padalkar : पडळकरांच आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य; हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये..