Home / News / राज्यात पुढील ३ दिवस पावसाचे!अनंत चतुर्दशीलाही हजेरी लावणार

राज्यात पुढील ३ दिवस पावसाचे!अनंत चतुर्दशीलाही हजेरी लावणार

Rain to Continue in Maharashtra for 3 Days, Likely on Anant Chaturdashi Too

Rain to Continue in Maharashtra for 3 Days, Likely on Anant Chaturdashi Too

Rain to Continue for 3 Days IMD – राज्यात गणेशोत्सवाच्या काळात सुरू झालेल्या पावसाने आता अनंत चतुर्दशीपर्यंतही (Anant Chaturdashi)उपस्थिती नोंदवण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा(rainfall across Maharashtra) इशारा दिला आहे. यामध्ये कोकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे, रायगड, ठाणे (Pune, Raigad, Thane)आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. परिणामी, गणेश विसर्जन मिरवणुकीवर पाऊस बरसणार असल्याने भक्तगणांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली अमरावती आणि जळगाव जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला होता. मुंबई आणि ठाणे परिसराला यलो अलर्ट जारी केला होता.

उद्या मुंबई, पालघर, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, नाशिक आणि धुळे या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यांतही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

५ व ६ सप्टेंबर रोजी कोकण, खानदेश आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामान खात्याचा इशारा लक्षात घेऊन योग्य काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

दोन्ही मतदारसंघात नाव काँग्रेस प्रवक्त्याला नोटीस ! पवन खेरा अडचणीत

जरांगे पाटील रूग्णालयात प्रकृती नाजूक असल्याने १५ दिवस विश्रांतीचा सल्ला

राज्यातील विविध परिवहन प्रकल्पांच्या खर्चाला मंजूरी